24 जूनला बसपा चा कार्यकर्ता मेळावा
नागपूर प्रतिनिधी जयंत साठे – : सत्ता प्राप्त करा या अभियानांतर्गत बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा व शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा 24 जून रोजी दुपारी 12 वाजता झाशी राणी चौकातील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात (चौथा माळा) होत आहे. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेशचे केंद्रीय प्रभारी भीम राजभर, प्रदेशाध्यक्ष ऍड संदीप ताजने व महाराष्ट्र प्रदेश चे स्थानिक प्रभारी ऍड सुनील डोंगरे प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली आहे.
कार्यकर्ता मेळाव्याच्या व संगठन समीक्षेच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, पृथ्वीराज शेंडे, राजीव भांगे, विजयकुमार डहाट, नितीन शिंगाडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष शादाब खान, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, प्रा सुनील कोचे, नरेश वासनिक, बाबूल डे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिला महासचिव प्रताप सूर्यवंशी, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, डॉ शीतल नाईक, जिल्हा महिला आघाडीच्या सुरेखाताई डोंगरे वर्षाताई वाघमारे, सुनंदाताई नितनवरे, शहर प्रभारी इंजि सुमंत गणवीर, विकास नारायने, ओपुल तामगाडगे, मा मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, उत्तरचे जगदीश गजभिये, दक्षिणचे जितेंद्र पाटील, पूर्वचे धम्मपाल गोंगले, पश्चिमचे सनी मून, दक्षिण-पश्चिमचे शिवपाल नीतनवरे, मध्य नागपूरचे प्रवीण पाटील आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने राबत आहेत.
कार्यकर्ता मेळाव्याला जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर व बूथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मा मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.