36 जनावरांची सुटका
13 लाख 61 हजाराचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ गुन्हे शाखेची कारवाई।
सुरेंद्र इखारे वणी :- यवतमाळ परिसरात पेट्रोलिंग करीत असताना खात्रीलायक माहितीनुसार गोवंश जातीचे जनावरे अवैधरित्या ट्रक मध्ये कोंबून कत्तलीसाठी यवतमाळ आर्णी मार्गे नांदेड कडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली त्या आधारे महादेव मंदिर मनदेव येथे नाकाबंदी करण्यात आली व ट्रकला अडविले व ट्रक मधील तीन इसम खाली उतरून पळायला लागले असता त्यातील एक इसम पळून जाण्यात यशस्वी झाला मात्र दोघांना ताब्यात घेण्यात आले तसेच ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये 36 जनावरे व त्यांना निर्दयपणे बांधून कोणत्याही प्रकारचा चारापाण्याची व्यवस्था न करता दिसून आली. 36 जनावरे व वाहन असा एकूण 13 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला . वाहनांमध्ये गोवंश बैल व गोरे दाटीवाटीने निर्दयपणे व क्रूरपणे कोंबून व दोरीने बांधून ठेवण्यात आले होते याबाबत ट्रकचालक झाकीर मुजिफ शेख वय 28 वर्ष भाई तलाव वार्ड पवनी जिल्हा भंडारा , बशीर अब्दुल अजीज कुरेशी वय 37 वर्ष शिवाजी चौक पिली नदी नागपूर याना ताब्यात घेण्यात आले .पळून जाणाऱ्या इस्माबाबत विचारणा केली असता सदर इसम जावेद खान असून त्याचे पूर्ण नाव माहीत नसल्याचे सांगितले तसेच सदरची जनावरे नागपूर येथील नासिर कुरेशी यांचे असल्याचे सांगून कत्तलीसाठी नेत असल्याचे सांगण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या जनावरांची मोक्ष गौसनवर्धन केंद्र मोक्षधम घाट यवतमाळ येथे व्यवस्था करण्यात आली आहे मात्र दोन जनावरांचा मृत्यूव झाल्याने शवविच्छेदन करण्यात आले सदरची कारवाई वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, गणेश वणारे, पोउपनी योगेश रंदे, पोहवा योगेश डगवार, महंमद चव्हाण, सुनील खंडागडे, पोना सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, निलेश निमकर, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, रजनीकांत मडावी, अमित झेंडेकर, नरेश राऊत, सतीश फुके, यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.