काँग्रेस कमिटीच्या वणी तालुका कार्याध्यक्षपदी घनश्याम पावडे तर शहर कार्याध्यक्षपदी प्रा दिलीप मालेकर
सुरेंद्र इखारे वणी – वणी विधानसभा क्षेत्रातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षच्या वणी तालुका कार्यध्यक्षपदी घनश्याम पावडे तर वणी शहर कार्यध्यक्षपदी प्रा दिलीप मालेकर यांची निवड यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष मलीककार्जुन खरगे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांचे नेतृत्वात काँगेस पक्षाची वाटचाल सुरू असून त्यांच्या दृष्टीकोनातून समाजातील सर्व स्तरातील व विशेषतः तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत काँगेस पक्ष पोहचणे आवश्यक आहे त्यासाठी आपण आपली जबाबदारी ओळखून सुयोग्य असे काम करून काँग्रेस पक्षाची प्रतिमा जनमानसात उज्वल करावी या दृष्टीकोनातून वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या वणी तालुका कार्यध्यक्षपदी घनश्याम पावडे व वणी शहर कार्यध्यक्षपदी प्रा दिलीप मालेकर यांची नियुक्ती यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा प्रफुल मानकर यांनी केली आहे . या निवडीचे श्रेय वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार व समस्त काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी ,सदस्य व कार्यकर्त्यांना देत आहे या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.