18.6 C
New York
Saturday, May 18, 2024

खरा भारत खेड्यातच राहतो – वैजनाथ खडसे

खरा भारत खेड्यातच राहतो – वैजनाथ खडसे

सुरेन्द्र इखारे वणी –  “शहराच्या महानगराच्या आधुनिक प्रगतीला विरोध करण्याची आवश्यकता नाही पण खरा भारत हा खेड्यातच राहतो. खेड्यांचा विकास साधला तरच देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. खेड्यांच्या अवस्थेवरूनच देशाच्या प्रगतीचा आलेख पाहता येईल. ही प्रगती करताना देखील गावाच्या मूलभूत स्वरूपाला सांभाळत ती प्रगती व्हायला हवी. तरच देश खऱ्या अर्थाने प्रगत होईल”असे विचार श्री वैजनाथ खडसे यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्याद्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या माझं गाव माझा वक्त या वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यान मालिकेतील बाविसावे पुष्प गुंफतांना ” ग्रामगीता प्रणित आदर्श ग्राम.” या विषयावर ते आधी व्यक्त होत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माधवराव सरपटवार तर प्रमुख उपस्थिती स्वरूपात अशोक सोनटक्के विराजमान होते.
ज्येष्ठ नाट्यकर्मी, विदर्भ साहित्य संघाचे सदस्य अशोक सोनटक्के यांनी प्रास्ताविक केल्यानंतर विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ अभिजित अणे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाच्या आरंभी श्री गंधेवार सर यांनी या भारतात बंधुभाव नित्य असू दे हे राष्ट्रसंतांचे गीत सादर केले.
आपल्या ससंदर्भ अभ्यासपूर्ण विवेचनात वैजनाथ खडसे यांनी पहिल्या अध्यायापासून शेवटपर्यंत ग्रामगीतेत वर्णन केलेल्या विविध विषयांचा परामर्श घेत आजच्या जीवनात ग्रामगीतेची अनिवार्यता अधोरेखित केली.
माधव सरपटवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन भगत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले राम मेंगावार आणि प्रमोद लोणारे यांनी विशेषत्वाने प्रयत्न केले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News