वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नागपूर प्रतिनिधी जयंत साठे :- वारकऱ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने निषेध करून नागपूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी आळंदीच्या पावन मंदिर परिसरात गर्दी नियंत्रित करताना बंदोबस्त आणि सुरक्षेसाठी तैनात पोलीस पथकाने निर्दोष वारकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला. या घटनेचा महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रत्येक जिल्हा कचेरीवर निषेध निदर्शने नोंदवून घटनेची चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करावि या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले. आळंदीत घडलेली घटना ही निषेधार्थ आहे. पोलिसांनी शिस्तप्रिय व निष्पाप वारकऱ्यांना संयमाने हाताळायला पाहिजे होते. वारकऱ्यांना प्रेमाने व आपुलकीने सांगितले असते तर भगदड झाली नसती. पोलिसांच्या लाठीचार्ज मुळे झालेल्या भगदाडीत अनेक महिला, विद्यार्थी व वृद्ध वारकरी जखमी झाले. वीस पोलिसांनी चार जणांना एका घरात कोंडून मारहाण केली याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. आणि दोषींवर तात्काळ गुन्हे नोंदविले पाहिजे. वारकरी शिस्तप्रिय प्रस्थान करीत असताना ते सरकारच्या विरोधात आंदोलन तथा शांतता व सुव्यवस्था मोडणारे कृत्यासाठी एकत्रित आलेले नसताना पोलिसांनी बळाचा वापर करून वारकऱ्यांवर अत्याचार केला. ही महाराष्ट्रातील समस्त तीस लाख कलावंताच्या मनात खदखद आहे.गेल्या चारशे वर्षाचा इतिहासात प्रथमच वारकरी दिंडीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. संतांना, कलावंतांना व वारकऱ्यांना आपल्या स्वराज्यात मनाचे स्थान देणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा बुद्धभूमीला व त्यांनी रुजविलेल्या मानवतेला काळीमा फासणारी ही घटना वारकऱ्यांच्या अस्मितेस ठेच पोचणारी आहे. कलावंताच्या सुखी जीवन जगण्यासाठीचे त्यांचे प्रश्न व त्यांच्या न्याय मागण्या सहानुभूतीने विचार न करता त्यांनी कोणतेही आर्थिक, मानसिक आधार न देता संतांचे व महापुरुषांचे विचार समाजात पेरणारे, जनसामान्यांच्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचविणारे वारकरी – कलावंतांवर अमानुष लाठीचार्ज करणे या घटनेने शासनाचा तोल ढासळल्याचे व जनसामान्यांना न्याय देण्यात संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने महिला, मागासवर्गीय, अनुसूचित जाती -अनुसूचित जमाती तसेच अल्पसंख्यांकांवरील अन्याय अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. त्यात वारकऱ्यांवरील अत्याचारांनी कळस गाठला आहे. या घटनेने महाराष्ट्रातील समस्त कलावंत क्षेत्र हादरले असून त्यांच्यात असुरक्षितता व दहशतीची भावना निर्माण झाली आहे.तरी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि सरकारने या दुर्दैवी घटनेची जबाबदारी स्वीकारून वारकऱ्यांची जाहीर माफी मागावी व कलावंतांच्या हिताचे निर्णय घ्यावे. अशी मागणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना प्रदेश महासचिव अँड शाम खंडारे, विदर्भ प्रमुख मनोहर शहारे, विदर्भ महिला आघाडी प्रमुख सरिता उराडे, सिद्धार्थ भवरे, जयंत साठे, डॉ. एम. एस. वानखेडे, नागोराव सोनकुसरे, प्रमोद कांबळे, प्रदीप मून, अरविंद पाटील, प्रतिभा पाटील, सुनंदा गायकवाड, शालिक जिल्हेकर, जगदीश राऊत, भारतीताई हिरेखन, नागेश वाहूरवाघ, मंजुषा शहारे, दीपक शहारे आदींचा समावेश होता.