बसपा ने शाहू जयंती साजरी केली
नागपूर प्रतिनिधी जयंत साठे :- आरक्षणाचे जनक बहुजन राजे राजर्षी छत्रपती शाहू यांच्या 149 व्या जयंती निमित्त नागपूर जिल्हा व शहर बसपा ने मेडिकल चौकात शाहू महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. मागील 20 वर्षापूर्वी नागपूर मनपा ने मेडिकल चौकात छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक व पुतळा बसविण्याचा एकमताने ठराव पास केला. परंतु तत्कालीन काँग्रेस-राका च्या व आजच्या भाजप-सेना च्या सरकारने महापुरुषांच्या स्मारकाकडे हेतूत: दुर्लक्ष करून शाहू महाराजांचा अपमान केला. त्यामुळे बसपा ने याप्रसंगी भाजप-काँग्रेसचा मुर्दाबाद व निषेध केला.
“शाहू महाराज आपका सपना अधुरा बीएसपी करेगी पुरा, राजा हो तो कैसा हो शाहू महाराज जैसा हो, आरक्षण के जनक शाहू महाराज के सन्मान मे बीएसपी मैदान मे, छत्रपती शाहू महाराज अमर रहे, जो बहुजन की बात करेगा व दिल्ली से राज करेगा, व्होट हमारा राज तुम्हारा नही चलेगा नही चलेगा, महापुरुषो के सन्मान में बीएसपी मैदान मे, संविधान के सन्मान मे बीएसपी मैदान मे” आधी उत्साह पूर्वक नारे देण्यात आली.
पुढील वर्षी शाहू महाराजांची 150 वी जयंती असल्याने मनपा व महाराष्ट्र शासनाने मेडिकल चौकात शाहू महाराजांच्या स्मारकाची कायदेशीर पायाभरणी करून स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात करावी जर मनपा व महाराष्ट्र शासनाने येत्या 2 महिन्यात असे केले नाही तर बसपा स्वतः ती पायाभरणी करेल अशी बसपा नेत्यांनी याप्रसंगी घोषणा केली. आजचा जयंती समारोह मेडिकल चौकातील शाहू स्मारकाच्या नियोजित ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश बसपा च्या सचिव रंजनाताई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
याप्रसंगी प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के व प्रा सुनील कोचे, शहर प्रभारी सुमंत गणवीर व विकास नारायने, माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, गौतम पाटील, डॉ आनंद भालेराव, चंद्रशेखर कांबळे, जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या सुरेखाताई डोंगरे, वर्षाताई वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी तर समारोप शहर प्रभारी ओपूल तामगाडगे यांनी केला.
याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, शहर उपाध्यक्ष उमेश मेश्राम, युवानेते सदानंद जामगडे, योगेश लांजेवार, उत्तर नागपूरचे अध्यक्ष जगदीश गजभिये, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, मध्य नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील, पूर्व नागपूरचे अध्यक्ष धम्मपाल गोंगले, सचीन मानवटकर, शंकर थुल, नितीन वंजारी, दक्षिण पश्चिम चे अंकित थुल, गौतम गेडाम, स्नेहल उके, बुद्धम राऊत, शामराव तिरपुडे, भानुदास ढोरे, संभाजी लोखंडे, विवेक सांगोळे, काशिनाथ सरदार, डॉ चांगदेव शेंडे, प्रवीण लिखार, सुमित जांभुळकर, महिपाल सांगोळे, राजरत्न कांबळे, अनिल मेश्राम, संबोधित सांगोळे, संगीत इंगळे, राजेंद्र सुखदेवे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.