मुस्लिम युवकांचा बसपात प्रवेश
नागपूर प्रतिनिधी जयंत साठे –
नागपूर: सत्ता प्राप्त करो अभियान अंतर्गत नागपुरातील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात नुकताच बसपाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात मुस्लिम समाजातील प्रसिद्ध युवा कार्यकर्ते अब्दुल महफुज ताजी याच्या नेतृत्वात पन्नासावर युवकांनी बसपात प्रवेश केला.
आदिवासी वीरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या शहीद दिनानिमित्त आयोजित या मेळाव्याला बसपाचे केंद्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी भीम राजभर, प्रदेशाध्यक्ष ऍड संदीप ताजने व विदर्भाचे प्रमुख ऍड सुनील डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.
बसपाचे युवा शहराध्यक्ष शादाब खान व जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या मार्गदर्शनात अब्दुल महफूज ताजी, अब्दुल मुद्दशर ताजी, अब्दुल फिरदोस ताजी, सैबाज खान ताजी, झुबेर खान ताजी, इरशाद शेख ताजी, तवकीर ताजी, फैजान शेख, हशिर खान, सुरज सिंग, अभिनव थुल, सुफी ताजी, समीर अन्सारी, अरमान खान, बादशाह खान, रियाज अन्सारी, राहील शेख, समीर अश्रफी, अहबाज शेख आदि प्रमुख युवा कार्यकर्त्यांनी बसपात पक्षप्रवेश केला.
बसपा नेत्यांनी त्या सर्वांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा व पुष्प देऊन पक्षात स्वागत केले.