वणीच्या ठाणेदारपदी अजित जाधव
सुरेन्द्र इखारे वणी:- येथील ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांची अकोला येथे बदली झाल्याने वणी येथील रिक्त जागेवर मुकुटबन येथील पोलीस निरीक्षक अजित जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांनी विलंब न करता तात्काळ वणीला वणी उपविभागातीलच मुकुटबन येथील पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना नियुक्ती दिल्याने लगेच दिनांक 26 जून 2023 रोजी रुजू होऊन आपल्या कार्याला सुरुवात केली आहे. शांतता प्रिय असणाऱ्या वणीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात तेव्हा रुजू होणाऱ्या ठाणेदारांपुढे गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मोठे आव्हान आहे. याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.