मुख्याध्यापिका सौ. अनिता शेकार यांचा नियतवयोमानानुसार सेवानिवृत्ती सत्कार
सुरेन्द्र इखारे वणी :- येथील विवेकानंद प्राथमिक शाळेतील कार्यतत्पर ,शिस्तप्रिय मुख्याध्यापिका सौ.अनिता शेकार यांचा 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीपर सत्कार श्रीरामकृष्ण विवेकानंद मंडळाचे वतीने करण्यात आला.
यावेळी श्रीरामकृष्ण विवेकानंद मंडळाचे उपाध्यक्ष डॉ शंकररावजी वऱ्हाटे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आला संस्थेच्या अध्यक्षा मातोश्री ताराबाई ठावरी , सचिव अविनाश ठावरी , संचालक श्रीराम पाटील कोगरे, संचालिका वंदना वऱ्हाटे, विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप आस्कर ,माजी मुख्याध्यापिका शालिनीताई रासेकर, विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या नवनियुक्त मुख्याध्यापिका भारती कोलप्याकवार तसेच सत्कारमूर्ती सौ.अनिताताई शेकार व बबनराव शेकार प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेतून भारती कोलप्याकवार यांनी सत्कारमुर्तीच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.याप्रसंगी शाल,श्रीफळ,भेटवस्तू व स्मृतिचिन्ह देऊन अनिता शिकार व बबनराव शिकार यांचा डॉ शंकरराव वऱ्हाटे यांचे हस्ते करण्यात आला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ शंकरराव वऱ्हाते म्हणाले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शेकार मॅडम या कार्यतत्पर,शिस्तप्रिय होत्या” असे मत व्यक्त केले.तसेच मातोश्री ताराबाई ठावरी, अविनाशभाऊ ठावरी,शालिनीताई रासेकर वंदनाताई वऱ्हाडे ,गुलहाने सर,गाडगे सर यांनी सत्कारमूर्ती बद्दल भावपूर्ण शब्दातून मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया देवाळकर यांनी केले तर आभार अश्विन राठोड यांनी मानले.कार्यक्रमाला विवेकानंद प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तसेच गणमान्य व्यक्ती,माजी विध्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.