केशव नागरी पतसंस्थेत मुख्याधिकारी यांनी केला लाखो रुपयांचा अपहार
सुरेन्द्र इखारे वणी – केशव नागरी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष महादेवराव खाडे यांनी 2 जुलै 2023 रोजी पत्रकार परिषदेत केशव नागरी पतसंस्थेच्या मुख्याधिकार्यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून त्यांची व त्यांच्या कुटुंबाची सखोल चौकशी विश्वसनीय एजन्सीमार्फत करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे. केशव नागरी पतसंस्थेच्या प्रगतीसाठी माजी अध्यक्ष महादेवराव खाडे यांनी अद्ययावत MIS प्रणाली सुरू केली. 2017-18 चा अंकेशण अहवाल सामान्य शेरे व सूचना अंतर्गत संस्थेचा राखीव निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुंतवावे अशी सूचना आली. त्यामुळे 2017-18 चा वैधानिक निधी 145 लाख जिल्हा बँकेत जमा करण्यास मुख्याधिकारी दीपक दीकुंडवार याना ऑक्टोबर2018 मध्ये सांगितले. पण त्याने तेथे जमा केले नाही. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्ये कोर बँकिंगचा प्रस्ताव आणला तेव्हा मुख्याधिकारी यांनी विरोधी भूमिका घेतली. जानेवारी2019 मध्ये कोटेशन आले आणि फेब्रुवारी 2019च्या मीटिंगमध्ये कोर बँकिंगला टोकाचा विरोध करून प्रस्ताव पुढे ढकलला कोर बँकिंग व MIS प्रणालीमुळे दीकुंडवार व सोबतच त्याचे पाठीराखे दौलत वाघमारे व अनिल अक्केवार यांचे ही भ्रस्ट व्यवहार उघड झाले असते .या भीतीमुळे मुख्याधिकारी यांनी अन्य संचालकांची दिशाभूल करून अध्यक्षपदावरून हटविण्यासाठी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. आणि सभासदत्व रद्द करण्याकरिता कारवाई केली. पण विभागीय सह निबंधकांच्या 26 एप्रिल 2023 च्या आदेशाने हैराण झाले. अपील मध्ये गेलो आहो असे विद्यमान अध्यक्ष म्हणाले परंतु केशव नागरी पतसंस्थेचा सदस्य अजूनही आहे. तक्रारीच्या आधारे जिल्हा उपनिबंधक नियुक्त समिती सदस्य सहायक निबंधक खाटरे यांचा अहवाल माहितीच्या अधिकारांतर्गत डिसेंबर 2019 ला मिळाला त्यानुसार संस्थेने राखीव निधी व इतर निधीची गुंतवूनुक जिल्हा बँकेत करणे अनिवार्य 2018-19 चा एकूण निधी 22733178 रुपये त्यापैकी 15828441 रुपये वैधानिक निधीची गुंतवणूक केली त्यापैकी 6904737 रुपये व्यवहारात आहे म्हणजे कोठे असा प्रश्न उपस्थित होतो. तर संस्थेच्या सी ए च्या अहवालात हा निधी गुंतवणुकीमध्ये आहे. म्हणजे संस्थेची हिशोबपत्रके संशयास्पद आहे. याचा अर्थ व्यवहारातला निधी 6904737 रुपये दीपक दीकुंडवार यांच्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट सोसायटी वणी येथे 70 लाख MIS मध्ये तर उर्वरित 124000ठेवी स्वरूपात जमा असल्याचे 31 मार्च 2022 चे संगणकीकृत इंटरेस्ट स्टेटमेंट मध्ये आहे. सहायक निबंधक खाटरे यांच्या अहवालानुसार 2018-19 चा राखीव निधी 7564307 रुपये आहे. यापैकी जिल्हा बँकेत 3352156 रुपये तर आयडीबीआय बँकेत 4212151 रुपये आहे. 31 मार्च 2019 च्या स्टेटमेंट मध्ये 1683846 रुपये जमा आहे तर उर्वरित रक्कम 2528805 रुपये गेली कोठे ही रक्कम सुद्धा दीकुंडवार व त्यांच्या पाठीराखे संचालकांच्या खात्यात गेली आहे का? मुख्याधिकारी यांचा तुटपुंज्य वेतन असताना त्यांच्याकडे आलिशान डबल फ्लॅट ,दोन चारचाकी वाहन, वैयक्तिक खात्यावर 71 लाख 24 हजार एवढी मोठी रक्कम कशी तेव्हा ज्या ज्या संस्थेमध्ये केशव नागरी पतसंस्थेच्या ठेवी आहेत त्या प्रत्येक संस्थेत दीकुंडवार यांचे व्यवहार शोधणे गरजेचे आहे एवढेच नव्हे तर त्यांच्या कौटुंबिक सदस्यांच्या नावे सोने ,जमीन,प्लॉट ठेवी अन्यत्र असू शकते याकरिता विश्वसनीय एजन्सीमार्फत सखोल चौकशी करणे अत्यन्त गरजेचे आहे असे पत्रकार परिषदेत प्रा महादेवराव खाडे यांनी सांगितले आहे.