केशव नागरी पतसंस्थेच्या कागदपत्रात खोडतोड करून CEO याना फसविण्याचा महादेव खाडेचा प्रयत्न फसला
बनावट दस्त व बनावट शिक्का वापरल्याबद्दल फौजदारी तक्रार करणार
सुरेन्द्र इखारे वणी – मागील काही दिवसांपासून संस्थेचे माजी अध्यक्ष महादेव खाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन संस्थेला बदनाम करण्याचा व संस्था बंद करण्याचा तसेच संस्थेचा CEO दीपक दीकुंडवार याना खोट्या कागदपत्रांच्या माध्यमातून फसविण्याचा प्रयत्न महादेव खाडे यांनी केला आहे असा आरोप संचालक मंडळाने पत्रकार परिषदेत केला आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष महादेव खाडे यांचे मनमानी कारभाराला व भ्रष्टाचाराला कंटाळून तत्कालीन संचालक मंडळाने त्यांचे विरुद्ध जिल्हा उपनिबंधक यांचेकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला व ठराव पारित झाला. त्यांचे अध्यक्षपद गेले व सदस्यपद सुद्धा गोठविण्यात आले. त्यामुळे महादेव खाडे यांनी आकसापोटी संस्थेविरुद्ध खोट्या बातम्या देणे , ठेवीदारांना, कर्जदारांना चुकीची माहिती देऊन गैरकायदेशीर कृत्य करीत आहे. त्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान होत आहे. संस्थेत कुठल्याही प्रकारचा भ्रष्ट्राचार नसताना महादेव खाडे यांनी खोटी तक्रार केली असता लेखा परीक्षण मध्ये कुठलीही अनियमितता आढळून आली नाही महादेव खाडे वारंवार संस्थेची बदनामी करत असल्याने संस्थेने महादेवराव खाडे यांचे विरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली त्यामुळे न्यायालयात विविध कलमा अंतर्गत प्रकरण सुरू आहे. महादेव खाडे हे आपल्या बाजूने निकाल लागल्याची खोटी माहिती देऊन पत्रकार परिषदेत पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक दीकुंडवार यांचेवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करण्यात येते ते सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहे . इतकेच नव्हे तर 2 जुलैला खाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन CEO यांचेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला व बनावट बँक स्टेटमेंट जोडले गेले. त्या स्टेटमेंट ची शहानिशा केली असता बँक स्टेटमेंट पूर्णपणे खोटे असून बनावटी आहे हे स्पष्ट केले. केशव नागरी पतसंस्थेच्या सर्व ठेवी संस्थेच्याच नावाने आहे दीपक दीकुंडवार यांचे नावाने नाही यावरून महादेव खाडे यांनी दिलेली प्रेस नोट व दिलेले बँक स्टेटमेंट बोगस ,खोटे व बनावटी आहे हे स्पष्ट होते संस्थेच्या ठेवी विविध बँकेत जमा आहे कुठल्याही व्यक्तिगत खात्यात जमा नाही मात्र महादेव खाडे लोकांमध्ये गैरसमज निर्माण करीत आहे. व पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप सुध्दा करण्यात आला आहे. महादेव खाडे यांनी 2 जुलैला घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रेसनोट सोबत बनावट बँक स्टेटमेंट पत्रकारांना देण्यात आल्याने लवकरच संस्थेद्वारा तसेच संबधीत संस्थेचे बनावट दस्त व बनावट शिक्का वापरल्याबद्दल फौजदारी तक्रार करण्यात येणार आहे असे पत्रकार परिषदेत संचालक मंडळाने सांगितले. संचालक मंडळाने नेहमी संस्थेचे हीत जोपासले आहे व संस्थेची प्रगती होत आहे तेव्हा सर्व सभासद खातेदारांनी संस्थेवर विश्वास ठेवावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर खोंड, उपाध्यक्ष दौलतराव वाघमारे, सचिव अनिल आक्केवार, विनायक कोंडवार, प्रा गजानन अघडते व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक दीकुंडवार यांनी पत्रकार परिषदेतुन केले आहे.