बसपाचे भीम राजभर यांची दीक्षाभूमीला भेट
नागपूर जयंत साठे: बहुजन समाज पार्टीचे केंद्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रभारी भीम राजभर तसेच महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी ऍड सुनील डोंगरे यांनी आज दीक्षाभूमी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट देऊन बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला, तथागताला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्रिशरण पंचशील ग्रहण केल्यावर बाबासाहेबांच्या चित्र प्रदर्शनीला भेट देऊन बोधिवृक्षाला नमन केले.
स्मारक समितीच्या वतीने स्मारकाचे मुख्य संरक्षक तसेच महाराष्ट्र प्रदेश बसपा चे मा महासचिव जितेंद्र म्हैसकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी भीम राजभर साहेबांसोबत ऍड रामप्रसाद चौधरी (आजमगढ), नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, मा प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, मा मनपा पक्षनेता गौतम पाटील, युवा नेता चंद्रशेखर कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.