वणी नागरी सहकारी बँकेचा 24 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
सुरेंद्र इखारे वणी :- वणी तालुक्यातील नावलौकिक असलेली वणी नागरी सहकारी बँक लिमिटेड वणी, बँकेचा 24 वा वर्धापनदिन आनंदात साजरा करण्यात आला आहे. वणी नागरी सहकारी बँकेची स्थापना 5 जुलै 1999 रोजी झाली असून आज रोजी नागरी बँकेत सभासद खातेदार मोठ्या प्रमाणात आहे तसेच शहरातील हितचिंतक यांच्या सहकार्याने नागरी सहकारी बँकेला आज रोजी 24 वर्ष पूर्ण झाली असून बँकेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.ही नागरी बँक जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून वणी शहरात वणी नागरी सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली.
वणी नागरी सहकारी बँक खातेदारांना ठेवीवर उत्तम व्याजदर देते,तसेच शेतकरी, कर्मचारी, छोटे व्यापारी यांना गृहकर्ज,वाहन कर्ज, मुदत कर्ज,सोनेतारण कर्ज, यंत्रसामग्री कर्ज देण्यात अग्रेसर भूमिका बजावत आहे. वर्धापनदिनी छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,आणि परिसरातील आराध्य दैवत जगन्नाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला उपस्थित बँकेचे अध्यक्ष तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ येथील उपाध्यक्ष श्रीमान संजयभाऊ देरकर,आणि बँकेचे उपाध्यक्ष श्री. बाबाराव बोबडे,संचालिका सौ. किरणताई देरकर संचालक ईश्वर धानोरकर,शरद दुमणे, प्रकाश चिकटे, फैजल खान, तज्ञसंचालक सतीश जुनगरी , सनदी लेखापाल कमल मदान तसेच कर्मचारी वृंद आणि सभासद उपस्थित होते.