पुरड येथील आशिष आवारीने दिले राष्ट्रीय पक्षी मोराला जीवनदान
सुरेंद्र इखारे वणी :- कायर पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरड गावाजवळील पंचधार ला लागून असलेल्या जंगलातील वन्य प्राणी गावाच्या दिशेने येत असल्याने शेतातील कीटकनाशकांची फवारणी होऊन असलेले पीक खाल्ल्याने राष्ट्रीय पक्षी मोर खाली पडल्याने येथील शेतकरी आशिष आवारी याने लगेच मोराला उचलून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली. पंचधारला लागून असलेले जंगल काही शेतकऱ्यांनी उठविल्यामुळे जंगलातील वन्य प्राणी पशुपक्षी जंगल सोडून गावाकडे येत असल्याने वन्यप्राण्यांचे तसेच पशुपक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. अशातच पुरड येथील शेतकरी आशिष आवारी याना राष्ट्रीय पक्षी मोर शेत परिसरात खाली पडलेल्या अवस्थेत आढळल्याने त्या मोराला उचलून वन विभागाच्या अधिकाऱ्याला कळविले व वनविभागाचे अधिकारी कविता मुळे निखाडे व वन विभागाचे टीम मोराला नेण्यासाठी गावात पोहचले व त्यांनी मोराला घेऊन उपचारासाठी वणी येथे नेले अश्या प्रकारे पुरडच्या आशीषने राष्ट्रीयपक्षी मोर या पक्षाचे प्राण वाचविले . पंचधारला वनक्षेत्र लागून असल्याने या वनातील वन्यप्राणी शेतात येतात आणि पिकांचे नुकसान करीत आहे. यापूर्वी हरणाच्या पिल्याचा कुत्र्यांनी पाठलाग करून जखमी केले होते अशीच या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने गावकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तेव्हा वनविभागाने जंगलाला कुंपन करावे . जेणेकरून वन्यप्राणी गावाकडे येणार नाही व शेतकऱ्याच्या मनात भीती राहणार नाही, अशी मागणी पुरड येथील शेतकरी आशिष आवारी व समस्त गावकऱ्यांनी केली आहे.