-1.4 C
New York
Friday, March 1, 2024

स्माईल फाउंडेशनच्या वतीने न.प. शाळा क्र.7 मध्ये वृक्षारोपण

स्माईल फाउंडेशनच्या वतीने न.प. शाळा क्र.7 मध्ये वृक्षारोपण

सुरेन्द्र इखारे वणी:- स्माईल फाउंडेशनच्या वतीने येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. 7 मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे, येथील वार्ताहर परशुराम पोटे, जितेंद्र कोठारी, इंदू सिंग, स्माईल फाउंडेशन चे अध्यक्ष सागर जाधव, शाळा क्र. 7 चे मुख्याध्यापक गजानन कासावार उपस्थित होते.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी स्माईल फाउंडेशन च्या वतीने वणी शहरात आवश्यकतेनुसार निरनिराळ्या भागात वृक्षारोपण करणे सुरू आहे. या संस्थेच्या वतीने या वर्षी 500 पेक्षा अधिक वृक्षांचे रोपन करण्यात आले आहे. या प्रसंगी शाळा क्र. 7 मधील खो-खो व कबड्डी च्या मैदानावर वड, कडुलिंब, चिंच व फळझाडे उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते लावण्यात आली.
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी व कल्पना मुंजेकर, चंदू परेकर, शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर, विजय चव्हाण, दिगंबर ठाकरे हे शिक्षक वृंद तसेच स्माईल फाउंडेशन चे सचिव आदर्श दाढे, उत्कर्ष धांडे, तन्मय कापसे,अनिकेत वासरीकर, मयूर भरटकर हे सदस्य उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News