*आरसीसीपीएल सिमेंट कंपनीची डोंगरगाव चुनखडी लिजक्षेत्र पर्यावरण जनसूनावणी 17जुलैला*
सुरेन्द्र इखारेवणी- डोंगरगाव चुनखडी लिजक्षेत्र गावे डोंगरगाव,दहेगाव,वेगाव ता.मारेगाव वणी जि.यवतमाळ हे लिजक्षेत्र आरसीसीपीएल सिमेंट कंपनी मुकुटबनने शासना कडून घेतलेले आहे.या लिजक्षेत्राची पर्यावरण जनसुनावणी दि17 जुलै 2023ला डोंगरगाव येथे घेण्यात येणार आहे. या लिज क्षेत्रामध्ये एकूण 252.36 हेक्टर जमीन जाणार आहे. 55 गावे, 88031 कुटुंबे 364306 लोकसंख्या यात बाधीत, प्रभावीत होणार आहे.या लिजक्षेत्रामुळे जल, जमीन,जंगल, हवा प्रदूषीत होऊन मानवी वस्तीसह निसर्गाची जैवविविधतेची विपरीत हानी होणार आहे.
या कंपनीसाठी कमी दरात शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठी दलाल लोक शेतकऱ्यांना दिशाभूल करत आहे.
कंपनीला जनसुनावणीमध्ये पर्यावरण, बंधीत शेतकरी,गावकरी हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो.
कंपनीने व पर्यावरण विभागाने ही जनसुनावणी जाणुनबूजन शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या पेरणी काळात घेण्यात येत आहे. या काळात शेतकरी शेतीकामात व्यस्त असल्यामुळे शेतकरी गैरहजर राहून आपल्या समस्या मांडू शकणार नाही. याचा फायदा घेऊन कंपनी आपले समर्थक लोक हजर ठेवून हजेरी पत्रावर सह्या घेऊन सुनावणी शांततेत मंजूर करून घेईल.स्थानिक बाधीत क्षेत्रातील लोकांचा विरोध होणार नाही.
समस्त बाधीत क्षेत्रातील शेतकरी गावकरी लोकांना विनंती आहे की,सर्वांनी या जनसुनावणीस उपस्थित राहून आपले आक्षेप, समस्या मांडाव्या.जरी ही जनसुनावणी पर्यावरण संबंधीत असली तरी शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी आपल्या मागण्या जोरदार पणे मांडणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी योग्य मोबदला मिळ्याल्या शिवाय जमिनी दिल्या नाही तर हा प्रकल्प होणारच नाही. म्हणून शेती विषयक मुद्दे यामध्ये मांडणे अतिशय महत्त्वाचे आहे.
1)समस्त शेतकऱ्यांनी जमिनीचा योग्य मोबदला मागावा.
2)स्थानिक लोकांना नोकरी, रोजगार मागावे.
3)दलाला मार्फत जमीन खरेदी मान्य करू नये.
4)कंपनीने एकमुस्त सर्वच जमिनी एका वेळेस खरेदी कराव्या.
5) जमिनीची एकमुस्त योग्य दरात खरेदी झाल्यावरच कंपनीला काम करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत परवानगी द्यावी.
कंपनी शासन,प्रशासनला हाताशी धरून अशिक्षित अज्ञानी लोकांना दिशाभूल करून कंपनी आपला हेतू साध्य करतात. जबरदस्तीने उत्खनन सुरू करून आजुबाजुच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करतात. असे अनेक कंपनी बाधीत क्षेत्रातील लोकांना पुर्वानुभव आलेले त्यांची लुबाडणूक झालेली आहे.
याचे वाईट परिणाम प्रकल्पग्रस्त लोक भोगत आहे.
या जनसूनावणी करीता कंपनीने अधिकारी व प्रकल्पग्रत शेतकऱ्यांशी मध्येस्ती करण्यासाठी जिल्हाधिकारी हजर असतात.
डोंगरगाव लिजक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, गावकऱ्यांनी या सुनावणीमध्ये जमिनीची खरेदी कंपनी नावाने नोंद,
जमीन खरेदीचे भाव व नोकरी तेथेच मंजूर करुन घ्यावी.
कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या संपूर्ण मागण्या जिल्हाधिकारी समक्ष मंजूर झाल्या नंतरच पर्यावरण हजेरी पत्रावर सह्या कराव्या.
या आधी कोणीही सही करून आपली फसगत करून घेऊ नये.
कंपनी अनेक फंडे वापरून दलालांचा वापर करून आपल्यात झगडे भांडणे लावून आपल्यात फुट पाडून
कवडीमोल भावात आपल्या जमीनी खरेदी करेल.
या पासून समस्त शेतकरी बांधवांनी जागृत रहाणे गरजेचे आहे.
या संबंधीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची सभा आयोजित करून मा.आमदार श्री.संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब विधानसभा मतदार संघ वणी.शेतकरी युवा नेते मा.श्री. वासुदेवजी विधाते,मा.श्री.संजयभाऊ देरकर तसेच अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना पदाधिकारी, समाजसेवकांनी,
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केलेले आहे.
जनसुनावणीसाठी संघटीत होऊन संघर्ष करण्यासाठी.
जल,जमीन,जंगल,हवा,ह़ोणारे प्रदुषण जमिनीचा योग्य मोबदला,नोकरी,स्थानिकांना रोजगार,बाधीत क्षेत्रातील लोकांचे होणारे नुकसान व त्याची भरपाई या बद्दलच्या अनेक मागण्या मांडण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी. बाधीत क्षेत्रातील समस्त शेतकरी, गावकऱ्यांनी दि.17 जुलै 2023 डोंगरगाव त.वणी येथे होणाऱ्या जनसूनावणीसाठी परिसरातील जनतेने बहुसंख्येने उपस्थितीत
रहावे असे आवाहन संयोजक अशोक गौरकार यांनी केले आहे.,,