अण्णाभाऊंना बसपाचे अभिवादन
अण्णाभाऊंनी उपेक्षितांचा संघर्ष मांडला
नागपूर जयंत साठे(प्रतिनिधी):- कही हम भूल न जाये या अभियानांतर्गत बहुजन समाज पार्टीच्या वतीने बहुजन महापुरुष साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 54 व्या स्मृतिदिना निमित्त आज नागपूरच्या दीक्षाभूमी चौकातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याला प्रदेश बसपाचे महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, पृथ्वीराज शेंडे, राजीव भांगे, विजयकुमार डहाट, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, माजी प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर, माजी प्रदेश सचिव उत्तम शेवडे, जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख सुरेखाताई डोंगरे, शहर प्रभारी ओपुल तामगाडगे आदींनी सामूहिक माल्यार्पण करून अभिवादन केले.
अण्णाभाऊ फक्त दीड दिवस शाळेत गेले. म्हणजेच अशिक्षित असूनही त्यांनी फकीरा, चित्रा, वारणेचा वाघ, वैजंता, चंदर, आवडा, माकडीचा माळ, वैर, गुलाम, रानगंगा, पाझर, अलगुज, मास्तर, कुरूप, तारा, मूर्ती, अग्निदिव्य, मथुरा आदी कथा कादंबऱ्या लिहून शाहिरीतून उपेक्षितांचा जीवन संघर्ष, त्यांचे वास्तव मांडले. त्यांचे साहित्य जगभर प्रकाशित झाले. रशियाने त्यांचा सन्मान केला. त्यांचे साहित्य अनेक विद्यापीठात शिकवल्या जाते. अशा साहित्य सम्राटांना भारतरत्न मिळावे व त्यांचे मूळ साहित्य पुनर्प्रकाशित व्हावे असे मत या प्रसंगी बसपा नेत्यांनी व्यक्त केले.
अण्णाभाऊंनी 75 वर्षांपूर्वी भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यावर व्यंग करून “ये आजादी झुठी है, देश की जनता भुखी है” या विषयावर मोर्चा काढला होता. 75 वर्षानंतरही करोडो लोक उपाशी, बेघर, बेरोजगार, अशिक्षित, गरीब दिसत असल्याचे मत व्यक्त करून “अण्णाभाऊ आपका मिशन अधुरा बीएसपी करेगी पुरा, यह सरकार वह सरकार चोर लुटेरो की सरकार” असे नारे देत देत बसपा नेत्यांनी अण्णाभाऊंना अभिवादन केले.
याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, शहर प्रभारी विकास नारायणे, ऍड अतुल पाटील, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, सदानंद जामगडे, माजी मनपा पक्षनेते गौतम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर, सुनंदा नितनवरे, वर्षा वाघमारे, रंजना घरडे, विमलताई, जगदीश गजभिये, नितीन वंजारी, जितेंद्र पाटील, योगेश लांजेवार, शंकर थुल, विलास मून, नवनीत धडाडे, पंकज नाखले, सुनील पाटील, भानुदास ढोरे, विवेक सांगोळे, प्रकाश फुले, परेश जामगडे, ऍड दिनेश वरखडे, जनार्दन मेंढे, चंद्रसेन पाटील, संगीत इंगळे, अनिल मेश्राम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर प्रभारी सुमंत गणवीर यांनी तर समारोप शहर सचिव अभिलेश वाहाने यांनी केला.