एकाच डॉक्टरांच्या भरवश्यावर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार
रुग्णांची प्रचंड हेळसांड
वणी (प्रतिनिधी) :-. वणी ग्रामीण रुग्णालयात राजपत्रित आठ डॉक्टरांची नियुक्ती असुन मात्र एकच डॉक्टर ओपिडी सांभाळत आहेत. परिणामी रुग्णांना मोठा त्रास होत आहे. एकाच डॉक्टरांच्या भरवशावर रुग्णालयाचा कारभार सुरू असून यामध्ये मात्र रुग्ण भरडले जात आहे त्यांची मोठ्या प्रमाणात हेडसांड होत आहे. एकच डॉक्टर शेकडो रुग्णांची नाड तपासून चालते करत आहे. आता या समस्येकडे लक्ष देणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वणी जिल्हा बनविण्यापेक्षा आधी वणीचे ग्रामीण रुग्णालयाकडे, ट्रामा केयर कडे नेत्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी केली आहे.