युवासेनातर्फे किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्य व्हायरल व्हिडीओचा निषेध
सुरेंद्र इखारे वणी:- भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्य व्हायरल व्हिडीओचा 20 जुलै 2023 रोज गुरुवारला युवासेनेद्वारे निषेध करण्यात आला. सदर आंदोलन हे वणीच्या शिवाजी महाराज चौकात दुपारी 3 वाजता करण्यात आले. या आंदोलनात किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला शेण व चपलेचा नैवेद्य देण्यात आला.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होताच त्याबाबत पूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली आहे. किरीट सोमय्या बाबत सर्व पक्षाकडून प्रचंड विरोध दर्शविला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वणीतील युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात गुरुवारी 20 जुलै रोजी वणीतील शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला चप्पलचा हार घालून व शेण मारून निषेध दर्शविण्यात आला.
आंदोलन करतेवेळी प्रथमेश कोहळे, मंगल भोंगळे,किशोर ठाकरे, महादेव खीरटकर, शैलेश धोटे, आकाश पेंदोर, प्रफुल बोर्डे, चेतन उलमाले, कशिब शेख, मोहिन शेख, अक्षय पथाडे, प्रविण मांडवकर, आदित्य सातपुते, महेश कोहले, पंकज दुमोरे, करण पचारे, सुरज मडावी, प्रफुल कोल्हे, चेतन मालेकर व बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.