वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात दीक्षांत समारंभ.
मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान
सुरेन्द्र इखारे वणी :- विद्यार्थ्यांच्या सुविधेच्या दृष्टीने विद्यापीठाने घेतलेल्या भूमिकेनुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित, शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात , शैक्षणिक वर्ष२०२२-२३ मध्ये पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रतिनिधिक स्वरूपात पदवीदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव अशोक सोनटक्के यांच्यासह संस्थेचे संचालक प्रमोद देशमुख, उमापती कुचनकार, अनिल जयस्वाल तथा कार्यकारी प्राचार्य मानस कुमार गुप्ता व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविकात मानस कुमार गुप्ता यांनी यशस्वी विद्यार्थी हा महाविद्यालयाचा अभिमान आहे असे मत व्यक्त केल्यानंतर उमापती कुचनकार आणि प्रमोद देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करीत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभकामना प्रदान केल्या.
अध्यक्षीय मनोगतामध्ये अशोक सोनटक्के यांनी मेंदू, मन, डोळे आणि कान सजक ठेवून संस्थेला अभिमान वाटेल असे कार्य भविष्यात करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी ईशान मिनरल प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या संस्थेतर्फे कॅम्पस प्लेसमेंट साठी आलेले भाग्यश्री क्षीरसागर, ईशा चौरसिया, प्रवीण मांडवकर आणि मानसिंग हे मान्यवर देखील उपस्थित होते.याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात २५ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक डॉ अभिजित अणे यांनी केले तर आभार डॉ.स्वानंद पुंड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनकर उरकुंडे, विजय उपाध्ये, शुभांगी भालेराव,जयंत त्रिवेदी, संजय बिलोरीया, पंकज सोनटक्के, नितेश चामाटे या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.