मणिपूर घटनेच्या विरोधात भारतिय कम्युनिस्ट पक्षाचे वतिने वणी,मारेगाव येथे तिव्र निषेध
अशोक लोनगाडगे मारेगाव :- मणिपूर हे राज्य देशाच्या पुर्व भागातील अतिशय महत्वाचे संवेदनशिल राज्य आहे,ज्या राज्यात मागील तिन महीण्यापासुन आजपर्यंत अतिशय अराजकात्मक परिस्थिती निर्माण करून हिंसा व अशांती निर्माण झाली.यावर भारतिय कम्युनिस्ट पार्टी आपली चिंता व्यक्त करून मणिपूरच्या पिडीत जनतेसोबत आम्ही आहो.यासाठी तेथील राज्य सरकार व केन्द्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करून 25 व 26 जुलै रोजी पक्षाचे वतिने वणी,मारेगाव येथे तहसीलदारमार्फत राष्ट्रपतिंना निवेदन पाठविण्यात आले.याप्रसंगी जिल्हासचिव अनिल घाटे,सहसचिव बंडु गोलर,राज्य कौंसिल सदस्य सुनिल गेडाम,सुनिल चिकाटे,सिध्दार्थ राऊत,सुरेश चौधरी,प्रेमनाथ मंगाम,गजानन मडचापे,डाॅ.श्रिकांत तांबेकर,प्रफुल्ल आदे,दत्तु कोहळे,धनराज अडबाले,बंडु कोवे यांचेसह बहुसंख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.