18.6 C
New York
Saturday, May 18, 2024

शासन आपल्या दारी अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार विविध योजनांचा लाभ

शासन आपल्या दारी अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार विविध योजनांचा लाभ

नागपूर जयंत साठे ( प्रतिनिधी) :-    सामाजिक न्याय विभागाअंर्तगत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभाचे प्रत्यक्ष वितरण कार्यक्रम तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सावनेर नवनिर्मित इमारतीचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन दि.29 जुलै, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमात मा.ना.श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्री.नितीन गडकरी, केंद्रिय मंत्री, परिवहन महामार्ग विभाग, भारत सरकार, मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, मा.ना.श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लाभाचे प्रत्यक्ष वितरण कार्यक्रम तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सावनेर नवनिर्मित इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, मा. श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, मा.श्री. सुमंत भांगे, सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई, मा.श्री. ओम प्रकाश बकोरीया, आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य पुणे, मा.श्री. अभिजित चौधरी, आयुक्त, नागपूर महानगरपालिका, मा. डॉ. विपिन ईटनकर, जिल्हाधिकारी नागपूर, मा.श्रीमती सौम्या शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर, मा.श्री. सुरेंद्र पवार, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी नागपूर, मा.श्री.राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती नागपूर इ. यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सदर प्रसंगी नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण वसतिगृह व निवासी शाळांना जोडणाऱ्या सीसीटिव्हि युनिटचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच मांग, मातंग, सफाई कर्मचारी, मांग गारोडी समाजातील लोकांना रमाई आवास घरकुल योजनेचे वाटप, कन्यादान योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यात भाग घेवून विवाह करणाऱ्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप, स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत धनादेशाचे वाटप, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप, दिव्यांगांना साहित्य वाटप, टच स्क्रीन स्टँडीचे विविध विभागांना हस्तांतरण, मृत पावलेल्या सफाई कर्मचारी यांचे वारसांना धनादेश वाटप, शासकीय वसतिगृहे व निवासी शाळेला सॅनेटरी नॅपकीन डिस्टॉय मशिनचे वाटप, अनुसूचित जाती उपयोजनेचे विविध योजनेअंतर्गत लाभ देणे, शासकीय वसतिगृहातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार इ. योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी याकरीता कार्यक्रमानंतर मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. सर्व इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर तसेच श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांनी केले आहे.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News