Wednesday, September 18, 2024
Google search engine
HomeUncategorizedदत्ताजी डिडोळकर जन्म शताब्दी वर्षानिमित्त सभा

दत्ताजी डिडोळकर जन्म शताब्दी वर्षानिमित्त सभा

दत्ताजी डिडोळकर जन्म शताब्दी वर्षानिमित्त सभा

* सुधीर साळी यांची वणी जिल्हा संयोजक म्हणून निवड

सुरेन्द्र इखारे वणी:-
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या देशातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेचे संस्थापक सदस्य स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात दि. 6 ऑगस्ट 2023 पासून होत आहे. या संदर्भात या वर्षात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची चर्चा करून विद्यार्थी परिषदेचे पूर्व कालीन कार्यकर्ते सुधीर साळी यांची वणी जिल्हा संयोजक म्हणून जबाबाबदरी देण्यात आली. देशात वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.

येथील नगर वाचनालायत वणी जिल्ह्याची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्व व वर्तमान कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अखिल भारतीय आयोजन समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. नारायण मेहरे, यवतमाळ विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. श्रीकांत पर्बत, विभाग संयोजक मनोज बोनगिरवार, हरिहर भागवत उपस्थित होते.
या बैठकीचे प्रास्ताविक गजानन कासावार यांनी केले. त्यानंतर उपस्थितांचा परिचय व त्यांच्या विद्यार्थी परिषदेच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर विद्यार्थी परिषदेचे संस्थापक सदस्य दत्ताजी डिडोळकर यांच्या प्रेरणादायी जीवनाची माहिती प्राचार्य श्रीकांत पर्बत यांनी दिली. त्यानंतर दि. 6 ऑगस्टला नागपूर येथे या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्ताजी होसबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ना. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे होणार आहे. या उदघाटन कार्यक्रमाला येण्याचे प्राचार्य नारायण मेहरे यांनी आवाहन केले. त्याला उपस्थितांनी प्रतिसाद देत सहमती दर्शवली.
यासोबत वणी परिसरातील विद्यार्थी परिषदेचे काम केलेल्या पूर्व कार्यकर्त्यांनी गजानन कासावार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीत 1966- 67 पासून विद्यार्थी परिषदेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्या ताराबाई कुलकर्णी पासून आता वर्तमान स्थितीत काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा संयोजक हर्षल बिडकर यांनी केले. आभार प्रदर्शन नगर मंत्री नीरज चौधरी यांनी केले.

Surendra Ikhare

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments