*जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त आधार ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था वणी व दि.वसंत को.ॲाप शेतकरी जिनिंग वणी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण*
अशोक लोनगाडगे मारेगाव-: वणी येथील आधार ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था वणी व दि.वसंत को.ॲाप शेतकरी जिनिंग वणी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वसंत जिनिंग येथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी वसंत जिनिंग वणी चे अध्यक्ष माननीय आशिष भाऊ खुळसंगे, कार्यकारी संचालक माननीय डॉ. शंकर वऱ्हाटे, संचालक पुरुषोत्तम आवारी,कोरडे सर,घनश्याम पावडे, अशोक नागभीडकर,सौ.साधनाताई गोहोकार,सौ.शारदाताई ठाकरे व इतर संचालक मंडळ आणि व्यवस्थापक कोसारकर साहेब आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला आधार ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था वणी चे अध्यक्ष प्रा. शैलेश आत्राम, आधार ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था वणी चे पर्यावरण विषयक मार्गदर्शक प्रा. डॉ. गजानन सोडणार, प्रा. बाळासाहेब देशमुख, प्रा. डॉ. प्रवीण कुलकर्णी, प्रा. डॉ. अनिल आडसरे व आधार ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था वणी चे कर्मचारी प्रवीण ठोंबरे हे उपस्थित होते.