तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी काँग्रेस कमिटीचे रास्तारोको आंदोलन
काँग्रेस कमिटीने दिले एसडीओना निवेदन सुरेंद्र इखारे वणी :- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या तसेच राष्ट्रपुरुषासंदर्भात बेताल वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणार्यांवर कार्यवाही करण्यात यावी या बाबतचे निवेदन वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम पावडे यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी निखिल धुळधळ तहसीलदार यांना देण्यात आले. वणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विचारात घेऊन शासनाने समस्यांचे निराकरण करण्याच्या घोषणा दिल्या परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला नाही . अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्या खालील प्रमाणे शासनाने वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी जाहीर झालेल्या ओल्या दुष्काळाचा काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. राज्य सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान जाहीर केले यामध्येही बरेच शेतकरी वंचित आहे, नियमित कर्जाची परतफेड करून काही बँकानी नवीन कर्ज दिले नाही, कोळश्याच्या वाहतुकीमुळे रस्त्यावरच्या शेतीचे नुकसान होत असून प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन तसेच रस्त्यावर साचलेल्या धुळीच्या प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात, ग्रामीण भागातील पांदनरस्ते मोकळे करून खडीकरण करण्यात यावे, ग्रामीण भागातील रस्त्याची सुधारणा करण्यात यावी, अतिवृष्टीमुळे खरवडून गेलेल्या शेतीचे पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई द्यावी , संभाजी भिडे गुरुजी यांच्या बेताल वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे अश्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात यावी, तसेच मणिपूर येथे झालेल्या हिंसाचारातील दोषींवर कारवाई करावी अश्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेला महाराष्ट्र शासन व प्रशासन जबाबदार राहील . यावेळी काँग्रेस कमिटीने साईबाबा मंदिराच्या चौकात दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले . संबंधित निवेदनाची प्रत वणीचे ठाणेदार अजित जाधव यांना देण्यात आले . यावेळी वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम पावडे, शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, वसंत जिनिगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, ओम ठाकूर, राजेंद्र कोरडे, अशोक नागभीडकर, अमित सँते, प्रदीप खेकरे, राकेश खुराणा, प्रकाश ढेंगळे, प्रशांत जोगी, अशोक निगम, मंगल मडावी, अशोक पांडे, रुपेश ठाकरे, विकेश पानघाटे, प्रमोद लोणारे, सुधीर खंडाळकर, डेव्हिड पेरकावार, राजू गव्हाणे, काजल शेख, गणेश जोगी, अनंत डुनभारे, यशवंत कळसकर, वृषाल काकडे, विजय झाडे उपस्थित होते.