सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
नागपूर ( जयंत साठे ) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक/ व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-20, 2020-21, 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
यापूर्वी अर्जदार/ संस्था ज्यांनी सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वित्तीय वर्षाकरीता अर्ज केला आहे, त्यांना नव्याने या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ज्या वर्षाकरीता अर्ज केला आहे. त्या वर्षाकरीताचे चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा. उपरोक्त कालावधीकरीता पूर्वी अर्ज केलेल्या व्यक्तींनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्काराकरीता अर्ज करण्यात येत आहे. त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरीता विहित केलेल्या अटीची पुर्तता करणे आवश्यक राहील. समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी सदर पुरस्कारासाठी दि.१५/०८/२०२३ पर्यंत अर्ज नमूद करण्यात कागदपत्रासह सादर करावे असे आवाहन श्री. सुमंत भांगे, सचीव, समाजीक न्याय व विशेष सहाय विभाग, मंत्रालय, मुंबई, श्री. ओम प्रकाश बकोरीया, आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट् राज्य पुणे व डॉ सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांनी केले आहे. सदर विविध पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.