भिडेच्या अटकेसाठी बसपाचा आक्रोश मोर्चा
नागपूर जयंत साठे – भिडे नावाच्या किड्याने महापुरुषांचा अवमान केल्यामुळे त्याच्यावर गुन्हे दाखल करून अटक करा या प्रमुख मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने 36 जिल्ह्यात म्हणजेच राज्यभर आज 3 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे निदर्शने व आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
*नागपुरातील संविधान चौकात महाराष्ट्र प्रदेशचे केंद्रीय प्रभारी भीम राजभर, प्रदेशाध्यक्ष ऍड संदीप ताजने, स्थानिक प्रदेश प्रभारी ऍड सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव नागोराव जयकर, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष शादाब खान यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात आजच्या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते*.
संविधान चौकात भर पावसात चार तास चाललेल्या धरणे निदर्शने कार्यक्रमात प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, राजेंद्र भांगे, विजयकुमार डहाट, नितीन शिंगोळे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिला महिला आघाडीच्या सुरेखाताई डोंगरे, सुनंदा नितनवरे, ताराताई गौरखेडे, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, शहराचे प्रभारी सुमंत गणवीर, विकास नारायने, ओपुल तामगाडे, अभय गायकवाड, योगेश लांजेवार, माजी नगरसेवक इब्राहिम टेलर, राजू चांदेकर, संजय जैस्वाल, सुनील बार्माटे, संजय ईखार, ऍड विरेश वरखडे, चंद्रशेखर कांबळे, गौतम पाटील, उमेश मेश्राम आदींनी भिडेच्या दुष्कृत्याचा निषेध करून त्यांच्या अटकेची मागणी केली.
*भिडे ला 14 ऑगस्टपर्यंत अटक करा अन्यथा गृहमंत्र्याला घेराव : एड संदीप ताजणे*
मनोहर नावाच्या विक्षिप्त भिडे ने बहुजन महापुरुषांचा अपमान केला तो बहुजन समाजाला सहन होण्याच्या पलीकडचा असल्यामुळे 14 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून जर अटक केली नाही तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरावर बहुजन समाज पार्टी मोर्चा काढून त्याचा निषेध करेल असे आवाहन केले.
*स्वतःचे सरकार आणून स्वाभिमानाने जगा : भीम राजभर*
देशात व राज्यात मनुवाद्यांचे सरकार असल्याने दलित, शोषित, मागासवर्गीय व अल्पसंख्यांकांवर अन्याय अत्याचार होतात, त्यांच्या महापुरुषांचा अपमान होतो, जर अन्याय अत्याचार व अपमान बंद करायचा असेल व सन्मानाने जगायचे असेल तर राज्यात व केंद्रातही बसपाचे सरकार आणा असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे केंद्रीय प्रभारी भीम राजभर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
*भिडेची जीभ कापा अकरा लाख मिळवा : पृथ्वीराज शेंडे*
भिडे ज्या जिभेच्या साह्याने महापुरुषाचा व राष्ट्राचा अपमान करतो त्याला शासन व प्रशासन पाठीशी घालते त्यामुळे अशा राष्ट्रद्रोही व महापुरुष द्रोही भिडेची जो जिभ कापून आणेल त्याला 11 लाख देण्यात येतील अशी घोषणा बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे यांनी याप्रसंगी केली. त्यामुळे शासनाने विना विलंब कारवाई करून कार्यकर्त्यांना कायदा हातात घेण्यापासून बचावावे असे अनेक कार्यकर्त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी यांनी तर समारोप जिल्हा सचिव डॉक्टर शितल नाईक यांनी केला. पक्षाच्या वतीने निवासी उपजिल्हा धिकारी सुभाष चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने उत्तरचे अध्यक्ष जगदीश गजभिये, दक्षिणचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, पूर्वचे अध्यक्ष धम्मपाल गोंगले, मध्यचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सुनील कोचे, विलास सोमकुवर, सदानंद जामगडे, अन्वर अंसारी, सचिन मानवटकर, नितीन वंजारी, अजय डांगे, मनोज निकाळजे, संभाजी लोखंडे, सुनील बार्माटे, चंद्रसेन पाटील, शकील वालदे, विनोद नारनवरे, चंद्रगुप्त रंगारी, प्रकाश फुले, निहाल गजभिये, बुद्धम राऊत, प्रणय मेश्राम, नागसेन गजभिये, आदेश रामटेके, अनिल मेश्राम, सुबोध साखरे, विलास मून, रामभाऊ कुर्वे, सुधाकर सोनपिपळे, पराग रामटेके, राष्ट्रपाल वाघमारे, अंकित थूल, ओमप्रकाश शेवाळे, शशिकांत मेश्राम, गौतम गेडाम, गौतम सरदार, उत्तम मेश्राम, तपेश पाटील, अजय गायकवाड, सावलदास गजभिये, अनिल साहू, परेश जामगडे, जनार्दन मेंढे, हेमंत बोरकर, राजेश नंदेश्वर, विशाल बनसोड, वीरेंद्र कापसे, प्रा करुणा मेश्राम, पुष्पाताई वाघमारे, वर्षाताई सहारे, रमा गजभिये, सुधा रंगारी, वर्षा वाघमारे, निर्मला गजभिये, धर्मशीला डोंगरे, इंदुताई तायडे, मंदाताई शेवडे यांच्यासहित शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.