अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा….!
समाजाच्यावतीने पहिल्यांदाच गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक
समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
सुरेंद्र इखारे वणी :- “जिथे कमी तिथे आम्ही” हा विचार बाळगून आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच विपरीत परिस्थितीत मेहनत करून जिद्दीने पुढे जाण्याऱ्या मादगी समाजाचा विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांचा 103 व्यां जयंतीचे औचित्यसाधून “मादगी बहुउद्देशीय संस्था”चा वतीने इयत्ता 10 वी, 12वी व विविध परीक्षेत तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या वणी ,मारेगाव व झरी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्याकरिता गुणगौरव सोहळा रविवार दि.6 ऑगस्ट 2023 रोजी ठीक दुपारी 12.00 वाजता वणी येथील वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी हॉल, शेतकरी मंदीर च्यामागे आयोजित करण्यात आला आहे.
सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष चरणदास कोंडावार (माजी नायब तहसीलदार),कार्यक्रमाचे उद्घाटक सुनिल मिद्दे (महासचिव मोची, मादगी, मादरु, मादिगा, महासंघ (M4)), तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून गणेश किंद्रे
(उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी) व प्रा. डॉ. करमसिंग राजपुत (अर्थशास्त्र विभाग प्रमुख, लो.टी. महा. वणी) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. अॅड. गजानन अंबलवार (LLB, LLM),अधिवक्ता नागपुर उच्च न्यायालय व मुरलीधर लाटेलवार (उपकोषाध्यक्ष मोची, मादगी, मादरु,मादिगा, महासंघ (M4)) हे असणार आहे.
वणी उपविभागात पहिल्यांदाच हा गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव व विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा मादगी समाजाचा वतीने संपन्न होत आहे तरी समस्त पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष निलेश परगंटीवार,
उपाध्यक्ष चरणदासजी कोंडावार,सचिव सुरज चाटे,सहसचिव रवि कोमलवार,कोषाध्यक्ष नथ्थुजी नगराळे,
प्रकाश तालावार (शिक्षक) ,राकेश शंकावार, अरुण एनपल्लीवार, विक्की पगंटीवार, विजय कंडेवार, शिवकुमार नलभोगे, प्रभाकर लिक्केवार, कैलास पौन्नलवार या आयोजकांनी केले आहे.