आम्रपाली फाउंडेशन तर्फे नेत्र तपासणी शिबिर
नागपूर जयंत साठे : – आम्रपाली फाउंडेशन, इंदोरा बुद्ध विहार व स्प्रिंग व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने आज इंदोरा येथील बुद्ध विहारात नेत्र तपासणी शिबिर पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जयंत साठे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शंकरराव खोब्रागडे, भन्ते नागसेन, आम्रपाली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमकुमार उके, विजन स्प्रिंग फाउंडेशन दिल्लीचे डॉ. मनीष यादव, अमोल जाधव, अश्विनी वाकुडकर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. शंकरराव खोब्रागडे म्हणाले की, नेत्र हे आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. त्याची वारंवार तपासणी केली पाहिजे. भारतीय लोकांना मधुमेहाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे डोळ्यांचे निकामी होणेही वाढत आहे. त्यासाठी नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे. डोळा नसेल तर आपल्याला सृष्टी पाहता येणार नाही. असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रेमकुमार उके, संचालन सुरज रोडगे, आभार मनिषा गवई यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्याणी डोंगरे, प्रा. ज्योती झोडापे, डॉ . हर्षला जांभुळकर, पल्लवी घाटे, डॉ. अमोल उके, सिध्दार्थ रणधीर, मिलिंद अंबादे यांनी परिश्रम घेतले.नेत्र शिबिराचा लाभ अरुण गोटे, शोभा बोरकर, मीना उके, रमेश ढुमणे, मुरलीधर वासनिक, किसन साखरे, पृथ्वीराज गोटे, प्रमोद कांबळे, प्रशांत हुमणे, पप्पू मोटघरे, रत्नप्रिया गणवीर, भंते नागसेन सचिन भालेराव, किशोर कोचे यांनी घेतला. या शिबिरात इंदोरा व आसपासचे गोरगरीब जनसामान्य नागरिक उपस्थित होते.