-1.3 C
New York
Friday, March 1, 2024

मारेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना व तहसील कार्यालयाचेवतीने  महसूल दिन 

मारेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना व तहसील कार्यालयाचेवतीने  महसूल दिन

अशोक लोणगाडगे मारेगाव:-    कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व तहसील कार्यालय मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल दिनानिमित्त मार्गदर्शन उपक्रम घेण्यात आला.
महसूल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनसाठी मतदार नोंदणी जनजागृती अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मारेगाव येथील नायब तहसीलदार ओसनी मडकाम मॅडम यांनी तहसील कार्यालयातून विविध प्रमाणपत्र काढण्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली व मंचावर उपस्थित यादव साहेबांनी विद्यार्थ्याकडून मतदार नोंदणी अभियान अंतर्गत ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले नाव मतदार यादीत कशाप्रकारे समाविष्ट करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थित डॉ. गजानन सोडणर, डॉ. राजेश चवरे, डॉ. प्रवीण कुलकर्णी व रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख आदींनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. सदर उपक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले..

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News