माझी माती माझा देश या अभियानांतर्गत नगर वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनी
ग्रंथप्रदर्शनी सोहळ्यात पंचप्रण शपथ
सुरेंद्र इखारे वणी:- येथील नगर वाचनालय वणी येथे आज दि. 9 ऑगस्ट क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त माझी माती- माझा देश या अभियानाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन घेऊन पंचप्रण शपथ घेण्यात आली. या ग्रंथ प्रदर्शनीचे उदघाटन नगर वाचनालयाचे सचिव तथा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार यांनी केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक हरिहर भागवत, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती जवादे, सेवानिवृत्त अभियंता नरेंद्र तराळे हे उपस्थित होते.
नगर वाचनालयातर्फे वणीकर नागरिकांसाठी नवीन खरेदी करण्यात आलेल्या ग्रंथांचे अवलोकन करता यावे यासाठी नवीन वाचनीय ग्रंथांची प्रदर्शनी भरविण्यात आली. त्यानंतर या देशाला 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करण्याऱ्या प्रति सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू. अशी शपथ उपस्थितांनी घेतली.