जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षावर अट्रॅसिटी चा गुन्हा दाखल. सहा आरोपी कैद
💠शहरांत भाईगिरी ने डोके काढले
💠नव्याने आलेले ठाणेदार शांतता व सुव्यवस्था कशी अबाधित ठेवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
सुधीर साळी वणी :- आम आदमी पार्टी चा वणी तालुका संयोजक असलेल्या निखिल धर्मा डुरके (वय 25)याला लोखंडी रॉडने चार जणांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी अखेर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा मुख्य सूत्रधार असलेल्या एका राजकीय पदाधिका-याचे नाव आरोपींच्या यादीत न टाकल्याने पोलीस ठाण्यात वाद निर्माण झाला होता. मुख्य आरोपीला स्थानिक पोलीस विभाग वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करत निखिलने गुरुवारी अमरावती येथे जाऊन प्रत्यक्ष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु झाली,अखेर या प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या काँग्रेसच्या पदाधिका-यासह 6 जणांवर भादंवि व ऍट्रोसिटीच्या कलमांन्वये विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.
तक्रारी नुसार, निखिल धर्मा ढुरके (25) हा वणीतील रंगनाथ नगर येथील रहिवासी असून तो शहरातील एका महाविद्यालयात एम.ए.चे शिक्षण घेत आहे. तो राजकारणातही सक्रीय असून आम आदमी पक्षाच्या तालुका संयोजक पदावर आहे. निखिलने दोन ते तीन महिन्याआधी शहरातील अवैधरित्या सुरु असलेला मटका जुगार बंद करण्यासाठी तक्रार दिली होती, आणि त्याचा पाठपुरावा ही सूरु केला होता,याच दरम्यान बुधवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास निखिल व त्याचा मित्र शेख जलील शेख फरिद यांनी दीपक चौपाटी जवळील एका टपरी वर चहा पित बसले होते,काही वेळानी त्याचा मित्र हा दुचाकी काढून निघून गेला तर निखिल दुचाकी काढत असता तिथे एका ग्रे रंगाच्या स्कुटीवर असलम अब्बास पठाण (27) व वसीम शेख (28) हे दोन तरुण आले. त्यांच्या हातात पेपरमध्ये लोखंडी रॉड होता.तिथे पोहोचतच “इजहार भाई से पंगा लेगा तो मार डालूंगा”असे म्हणत त्यांनी त्याच्या जवळील लोखंडी रॉड काढून निखिलला रॉडने मारण्यास सुरवात केली. त्याचवेळी आणखी तिघे जण तिथे आले. त्यातील एकाचे नाव ताहीर शेख रफीख शेख (28), दुसरा अल्ताफ चिरी (27) तर तिसरा अज्ञात (वय अंदाजे 50) तोंडावर स्कार्फ बांधला होता. त्यानंतर चौघांनी मिळून निखिलला रॉडने बेदम मारहाण केली. तर स्कार्फ बांधलेला त्यांच्या सोबत उभा होता.मारेक-यांनी डोक्यावर रॉडने प्रहार सुरु असताना निखिलने डोक्यावर हात ठेवला,त्यामुळे त्याच्या हाताला जबर मार लागला त्याच वेळी त्यांनी त्याच्या पायावरही रॉडने जोरदार प्रहार केले. मारहाण करून चौघांनी निखिलला कॅन्टीन समोरुन चौपाटीच्या मध्यभागी आणले,दरम्यान निखिलने 112 क्रमांकावर पोलिसांना कॉल केला. त्यामुळे मारहाण करणारे पळून गेले. हे सर्व माणसं इजहार ग्यासुद्दीन शेख (45) याचे असल्याचा आरोप निखिलने केला आहे.
(इजहार ग्यासुद्दीन शेख हा काँग्रेस पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. त्याचे नगर पालिकेच्या अगदी जवळ असलेल्या आरोग्य विभागाच्या बाजूला कार्यालय आहे. सदर कार्यालय हे अतिक्रमण करून बांधलेले आहे. हे कार्यालय काढण्यासंबंधी निखिलने माहितीच्या अधिकारात पालिकेला माहिती मागितली होती. त्यावेळी इजहारने निखिलला माझा ब्लॉक हटवण्याच्या प्रयत्न केल्यास मुलं पाठवून मारेल अशी धमकी दिली होती. तसेच त्याच्या आईला कॉल करुनही त्याने तुझ्या मुलाला समजावून सांग अशी धमकी दिली होती.)
मारहाण झाल्यानंतर निखिलने त्याच्या मित्रांना बोलावून घेतले. त्यांनी निखिलला ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला एक्स रे काढण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ते एका खासगी रुग्णालयात गेले. तिथे एक्स रे काढला असता त्याचा डावा हात व उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ फ्रेंक्चर झाल्याचा रिपोर्ट आला. तिथून निखिलने मित्रांसह पोलीस स्टेशन गाठले. मात्र तिथे तक्रारीत आरोपींमध्ये इजहार याचे नाव टाकण्यावरुन वाद झाला. त्यामुळे निखिलने अमरावती गाठत पोलीस महानिरीक्षकांची भेट घेतली. अखेर या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी इजहार ग्यासुद्दीन शेख (45), असलम अब्बास पठाण (27) व वसीम शेख (28), शेख रफीख शेख (28), अल्ताफ चिरी (27) व एक अनोळखी इसम (वय अंदाजे 50 ) अशा 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भादंविच्या कलम 307, 326, 143, 147, 148, 149, 506, 109 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार 3 (2) (VA), 3(2), 3 (V), 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराची शांतता व सुव्यवस्था कशी ठीक राहील यासाठी पोलीस प्रशासन किती जागृत राहतील हा चिंतनचा विषय आहे.
सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार अजीत जाधव करीत आहे