लोकमान्य टिळक महाविद्यालयात रोजगार मेळावा.
रोजगाराच्या सुवर्ण संधीत 4 विद्यार्थ्यांची निवड
सुरेन्द्र इखारे वणी :- शिक्षणाची परिणती उदरनिर्वाहाच्या सुविधेमध्ये व्हावी या दृष्टीने समाजातील कंपन्यांना आवश्यक असणारे कौशल्य पूर्ण विद्यार्थी आणि कंपन्यांमध्ये थेट संवाद साधून देण्याच्या भूमिकेतून शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाने इवोनिट व्यालु स्टील मर्यादित आणि इवोनिट मेटॅलीक मर्यादित. वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने बी.एस्सी (पी.सी.एम.) ग्रुप आणि एम. एस्सी. च्या विद्यार्थ्यांसाठी ८ अॅागस्ट २०२३ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते
. या रोजगार मेळ्याव्यामध्ये चंद्रपूर, यवतमाळ, नागपुर, व अमरावती जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. साधारणपणे १२५ विद्यार्थ्यांनी आँनलाईन नोंदणी केली होती. त्यांपैकी ४० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे सहभाग घेतला.
यामध्ये विकल्पीय चाचणी परीक्षेत १३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली व त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली. मुलाखती घेतल्या नंतर ४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
सुरूवातीला कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, विभाग प्रमुख डॉ. सुनंदा आस्वले, कंपनीतर्फे श्री. दिलीप लखमापुरे वरीष्ठ व्यवस्थापक, श्री. विजय गुल्हाणे उपव्यवस्थापक, श्री. विवेक मिश्रा व्यवस्थापक, श्री. वृषभ चव्हाण (एच. आर.) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राहुल ठेंगणे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत लिहितकर यांनी केले. या कार्यक्रमा करीता श्वेता राऊत, अमित काळे, अश्विनी धुळे, मोनाली कडासने तसेच रसायनशास्त्र प्रयोगशाळातील श्री. राजु आगलावे, श्री. जयंत व्यवहारे , श्री. कुशल झाडे आणि श्री. जयंत त्रिवेदी यांनी विशेष परिश्रम घेतले.