19 C
New York
Saturday, May 18, 2024

भिलगाव येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांचा सत्कार

भिलगाव येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांचा सत्कार
नागपूर (जयंत साठे): ग्रामपंचायत भिलगावच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश हा उपक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भावनाताई चंद्रकांत फलके होत्या. या उपक्रमानिमित्त विद्यमान सैनिक व स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार समारंभ सरपंच भावनाताई फलके यांच्या हस्ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भिलगाव येथे पार पडला. याप्रसंगी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक यु.जे. कांबळे, बबन मनोहरे, किशोर सोमकुवर, योगेंद्र दुबे, जे.एच. धमगाये, अरुण मोर्चापुरे, किशोर बारसागडे, एस. के. जयस्वाल, दिलीप जयस्वाल, आयुष मेश्राम, रणजीत सिंग यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प. सदस्य मोहन माकडे, उपसरपंच मनोज जीभकाटे, ग्राम पंचायत सदस्य शेखर वंजारी, रेणूराणीताई सोनी, वृषालीताई सहारे, गुणवंता माकडे, लतेश्वरीताई काळे, राजेंद्र लेंडे, नैनीताई देशभ्रतार, उषाताई उईके, आशिष भणारे, रूपालीताई बांगडकर, पल्लवीताई चौधरी, स्वप्नाताई बोदेले सचिव आतिश देशभ्रतार व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कमलताई लाड, संचालन शेषराव लेंडे तर आभार मारोती मते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप धोपटे, दिनेश झिलपे, भावनाताई पेदुलवार, राजेंद्र फुलझेले, गायत्री भोयर, राजेश पोटभरे, भोजराज सायवानकर, महाकाळकर, सुनील बालपांडे, सुनीता राऊत, तृप्ती वंजारी, मारुती भक्ते, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या प्रांगणात असलेल्या शिलाफलकाचे अनावरण शिक्षण समिती सदस्य मोहन माकडे यांच्या हस्ते पार पडले. सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News