नगर परिषदेच्या क्रांतीवीर बिरसा मुंडा शाळेत वसुधा वंदन उपक्रम शाळेत 25 रोपटांची लागवड सुरेंद्र इखारे वणी :- दि.१४ ऑगस्टला क्रांतिविर बिरसा मुंडा न. प. प्राथ.शाळा क्रं.9 या शाळेत माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत वसुधा वंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला नव्यानेच न. प.वणीला रूजू झालेले मुख्याधिकारी मा. विजयजी लोहकरे. साहेब व उपमुख्याधिकारी मा.जयंतजी सोनटक्के साहेब तसेच मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार उपस्थित होते . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावांनिमित्ताने *माझी माती माझा देश* या उपक्रमाअंतर्गत वसुधा वंदन कार्यक्रम घेण्यात आला. आपल्या माती विषयी जनजागृती ,प्रेम, व साक्षरता निर्माण व्हावी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची घोषणा केली होती. या अभियानांतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करून मुख्यत्वाने पंचप्रण शपथ, शिलाफळक, अमृत वतीने, देशी रोपांची लागवड इत्यादी उपक्रम घेण्याची घोषणा केली स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेत मान्यवरांचे हस्ते रोपट्यांची लागवड करण्यात आले. या वेळी शाळेतील 25 विद्यार्थ्यांनी 25 रोपट्यांची लागवड केली . *एक मुल एक झाड* या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड दत्तक घेतले त्यामुळे त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्याने स्वीकारली आहे त्यामुळे शाळा ही हरित होणार आहे. .असे मुख्याध्यापक दिलीप कोरपेनवार यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी अध्यापिक सौ वेणूताई कोटरंगे, नंदिनी थुल ,चौधरी काकाजी व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला