राष्ट्रध्वजातून सम्राट अशोकाचा भारत प्रतीत होतो : डॉ नीरज बोधी
नागपूर जयंत साठे :- भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आर टी एम नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण परिषदेचे संचालक डॉक्टर मंगेश पाठक यांच्या हस्ते पूर्णचंद्र बुटी सभागृह परिसरात राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी डॉ आंबेडकर विचारधारा विभागाचे व डॉ आंबेडकर अध्यासन चे प्रमुख डॉ अविनाश फुलझेले व आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्र व पाली विभाग प्रमुख डॉ नीरज बोधी ह्यांनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डॉ तुळसा डोंगरे, डॉ सुजित बोधी, डॉ रेखा बडोले, प्रा सरोज वाणी, प्रा ममता सुखदेवे, उत्तम शेवडे, किशोर ढोक, श्याम फाळके, सचिन देव, संजीव पठाडे, इंद्रराज वासे, मोरेश्वर मंडपे, अड अवधूत मानवटकर, सखाराम मंडपे, प्रीती गणवीर, संजय शेंडे, सुरेश हाडके आदी शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.