*गुरुदेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*
सुरेन्द्र इखारे वणी :- गुरुदेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर येथे ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती विकास मंडळ शिरपूर चे सन्माननीय सचिव श्री. पुरुषोत्तम पाटील कोंगरे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. मोतीराम परचाके, पर्यवेक्षक श्री. किशोर उमाटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे जेष्ठ शिक्षक प्रा. सुधीर वटे व शिक्षक-शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.यावेळी वर्ग ५ ते १२ मधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, ध्वजगीत, समूहगीत सादर केले.
स्वातंत्र्याच्या या अमृतोत्सवानिमित्त शाळेमध्ये प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले व विद्यार्थी मोठ्या आनंदाने कार्यक्रमात सहभागी झाले होते.स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण शाळेचे प्रांगण झेंडे, फुगे, रांगोळी इत्यादींच्या साहाय्याने अतिशय सुंदर सजवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे प्राचार्य श्री. मो.ल.परचाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रा.गणेश लोहे व श्री. योगेश किन्हेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रुपेश धुर्वे यांनी केले.