रंगनाथनगर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात सुरेंद्र इखारे वणी –: स्थानिक रंगनाथनगर येथील छत्रपती शाहू महाराज चौकात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. यावेळी रसूल रंगरेज आणि परिसरातील नागरिकांनी छत्रपती शाहू महाराज तसेच महापुरुषांच्या प्रतिमेला हारार्पण केले. यावेळी परिसरातील विद्यार्थी आणि मनोज जीवने, सलीम शेख, रवी गुप्ता, दीपक ठोंबरे, गणेश पडोळे, रुपेश शेंडे, कैलाश निखाडे, रितेश बोरपे, हरीश पडोळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. नंतर विद्यार्थ्यांना फळवाटप झाले. कार्यक्रमाचे संचालन प्रल्हाद कोठार यांनी केले.