काष्ट्राईब महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
नागपूर जयंत साठे: महाराष्ट्र राज्य काष्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ, डाँ बाबासाहेब आंबेडकर, संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, यांच्या संयुक्त विद्यमाने 10 वी 12 वीत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा व विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आज सकाळी 11वाजता,सामाजिक न्याय भवन, समाजकल्याण विभाग, दीक्षाभूमी रोड, नागपूर येथे कस्ट्राईब कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
200विदयार्थ्यांना सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, समाज कल्याण सहाय्यक उपयुक्त सुकेशिनी तेलगोटे, सेंट पॉल महाविद्यालयाचे संचालक डॉ. राजाभाऊ टाकसाळे, संघमित्रा ढोके, डॉ.. निवृत्ती राठोड, जिल्हा चिकित्सा अधिकारी, अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी,ओबीसी नेते प्रा. रमेश पिसे डॉ .राजेश पवार, बालरोग तज्ञ,प्रा नंदू खोब्रागडे, व श्यामराव हाडके विचार पिठावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम घेऊन वाटचाल करावी असा संदेश डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी दिला.
या प्रसंगी रमेश फुले,अॅड. अजय निकोसे, राजेश ढेंगरे,,प्रीतम बुलकुंडे, प्रा. जयंत जांभूळकर व भूषण राऊत, यांना विविध पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णं पदक प्राप्त केल्या बद्धल ओजस प्रवीण देवतळे या विद्यार्थ्यांचा,दोन्ही हात नसताना पायांनी पेपर लिहून 10व्या वर्गात 80%गुण प्राप्त करणाऱ्या साक्षी बोरकर व 12वर्षाच्या शृंखल खेमराज भोयर विद्यार्थ्याने इंग्रजी भाषेत काव्य संग्रह लिहल्या बद्दल,त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सायरे, संचालन सीताराम राठोड तर आभार सुगत रामटेके यांनी केले.
कार्यक्रमाला अशोक पाटील, रवी पोथारे, कैलास खोंडे, शामराव हाडके, कृष्णा मसराम, राजेश ढेंगरे,एम. एस. वानखेडे, अरविंद पाटील, भारती हिरेखन यांनीतसेच नागेश वाहूरवाघ यांनी सहकार्य केलें..