25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांचा सन्मान 
अशोक लोणगाडगे मारेगाव :-  शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव द्वारा संचालित कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मारेगाव हे यवतमाळ जिल्ह्यातील NAAC द्वारे B+ दर्जा प्राप्त महाविद्यालय आहे. विद्यार्थी गुणवत्ता विकास हे महाविद्यालयाचे उद्दिष्ट घेऊन महाविद्यालय काम करते. महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहेत. महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थ्यांची असोसिएशन रजिस्टर करण्यात आलेली आहे. या असोसिएशनच्या माध्यमातून महाविद्यालयात
दिनांक 19 /8 /2023 रोजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विद्यार्थी असोसिएशनचे पदाधिकारी व अनेक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी महाविद्यालयाकडून सर्व माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आम्हाला घडविण्यामध्ये महाविद्यालयाचे कसे योगदान आहे यावर आपले विचार मांडले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.एन . आर. पवार सर हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की महाविद्यालयाच्या विकासामध्ये माजी विद्यार्थी फार मोठी भूमिका बजावू शकतात. माजी विद्यार्थी हे आजी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणू शकतात. प्रोफेसर डॉ.गजानन सोडनर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. माजी विद्यार्थी हे सतत महाविद्यालयाशी जोडलेले राहावेत म्हणून माजी विद्यार्थी असोसिएशनची स्थापना करण्यात आलेली आहे असे मत त्यांनी अध्यक्ष भाषणातून व्यक्त केला. याप्रसंगी डॉ.माधुरी तानुरकर , डॉ. विनोद चव्हाण, डॉ. प्रवीण कुलकर्णी, प्रा. बाळासाहेब देशमुख, डॉ. विभा घोडखांदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News