बाबापूर येथे शिक्षण परिषद संपन्न
शिक्षण परिषदेत नवनियुक्त शिक्षकांचा सत्कार
सुरेंद्र इखारे वणी :- तालुक्यातील बाबापूर येथे नेरड केंद्र स्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबापूर येथे संपन्न झाली.
या परिषदेच्या अध्यक्षा सरपंच निर्मला खैरे या होत्या.
प्रमुख उपस्थिती शाळा व्यवस्थापन समिती सभापती हनुमंत केळझरकर, नेरड चे केंद्रप्रमुख राजेश खुसपुरे सर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक किशोर चहांदे उपस्थित होते.तसेच शिक्षण परिषदेचे मार्गदर्शक सचिन पिंपळकर सर, कु. प्रतिभा कोठेकर मॅडम, रुपाली मोवाडे मॅडम, नितिन जी पारखी सर . अनुराधा केळकर मॅडम, ताजने सर BRC साधन व्यक्ती विनोद नासरे सर बावणे सर उपस्थिती होते.परिषदेचे संचलन माटे सर यांनी केले.तर
आभार सचिन पिंपळकर सर यांनी मानले .या परिषदेला केंद्रातील नवीन नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या परिषदेला केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक हजर होते.या परिषदेचा समारोप अल्पोपहारानी झाला.