तर वाल्मिकी समाज बाबासाहेबांच्या चळवळीत असता
प्रा. किशोर बिर्ला यांचे प्रतिपादन
नागपूर जयंत साठे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षा सोहळ्यात बाबू रामरतन जानोरकर यांच्यासोबत २१ लोकांनी धम्मदीक्षा घेतली. त्यांनी वाल्मिकी समाजाच्या उत्थानासाठी योग्य प्रकारे प्रयत्न केले असते तर हा समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म चळवळीत सामील झाला असता असे प्रतिपादन प्रा. किशोर बिर्ला यांनी व्यक्त केले. बहुजन हिताय संघाच्या सभेत ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीव गाडे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शंकर खोब्रागडे, बौद्धाचार्य शांताराम रंगारी, एडवोकेट हंसराज भांगे, प्राध्यापक सुधाकर चौधरी उपस्थित होते. प्रा.किशोर बिर्ला पुढे म्हणाले की, वाल्मिकी समाज आज अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकून पडला आहे. त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात रुजविण्याचा मी प्रयत्न करीत आहे. कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंकर खोब्रागडे, समापन गाथा बौद्धाचार्य देविदास राऊत, राष्ट्रगीत अरुणाताई पाटील, संगीताताई पानतावणे आणि वर्षाताई टेंभेकर यांनी सादर केले. आभार प्रदर्शन नंदाताई भगत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वत्सलाताई गणवीर, नीताताई रामटेके, कमलाकर डोंगरे व बहुजन हिताय संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले