नगर परिषद क्षेत्रातील बांधकाम नियमाला डावलून
प्रशासकला लक्ष देण्याची गरज ; अन्यथा आंदोलनाचा इशारा
सुरेंद्र इखारे वणी :- नगर परिषद क्षेत्रातील नाल्या व रस्त्याच्या बांधकामात प्रचंड अनियमितता व नियमबाह्य कामे सुरू असल्याबाबतचे निवेदन युवासेना उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे यांनी मुख्याधिकारी जयंत सोनटक्के याना दिले आहे.
वणी शहरात नगर परिषद अंतर्गत विविध ठिकाणी नाल्यांचे व रस्त्याचे बांधकाम सुरू आहे यामध्ये जैताई मंदिर परिसरात, टिळक नगर , सत्यसेवा हॉस्पिटल परिसर, तसेच भारत माता चौकापासून ते टागोर रस्ता अशी कामे सुरू आहे यामध्ये जवळपास काही कामे झालेली आहे तर काही ठिकाणी नाल्याचे काम सुरू आहे त्या नाल्याच्या कामासाठी जी सिमेंटचे पाईप रस्त्यावर अस्ताव्यस्त टाकल्याने तसेच बांधकामाचे मटेरियल असल्याने रस्त्यावरून चालणाऱ्यांचे अपघात झाला आहे. इतकेच नव्हे तर शाळेत जाणाऱ्या चिमुकल्याणाचा अपघात होऊन जखमी झाले आहे. तेव्हा या बांधकामावर ज्यांचे नियंत्रण आहे त्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर पडलेल्या मटेरियल मुले अपघात होत आहे त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी होत असून तसेच बांधमाचे इस्टीमेट, नकाशे व कामाचा करारनामा देण्यात यावा जेणेकरून कामाची गुणवत्ता चाचणी सुध्दा घेता येईल या दृष्टीकोनातून मागितलेली कागदपत्रे 10 सप्टेंबर2023 पर्यंत देण्यात यावे अन्यथा लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला संबधीत निवेदनाच्या प्रति नगर परिषद प्रशासक निखिल धूळधळ तहसीलदार वणी याना देण्यात आले आहे.यावेळी अजिंक्य शेंडे, अक्षय हेपट, अक्षय मत्ते, प्रफुल बोर्डे, काशीम शेख, अमोल केळकर, राजू वाघमारे, सूरज चिंतळवार, श्रीनिवास एडलावार, शीतल एडलावार, योगेश आडे, विक्की पळगांतीवार, अमोल नक्षीने, राहुल खोब्रागडे उपस्थित होते.