वणीत उद्या विदर्भस्तरीय ‘ आझादी की दौड’ आ.संजीवरेड्डी बोदकूरवार यांचे हस्ते उद्घाटन
सुरेंद्र इखारे वणी :- शिक्षण प्रसारक मंडळ, वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय, आणि वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित वणी लायन्स इंग्लिश मिडियम हायस्कूल, ज्युनिअर अँड सिनियर कॉलेज, यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विदर्भस्तरीय ‘आझादी की दौड ‘ स्पर्धेचे आयोजन दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी साडे सहा वाजता करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांचे हस्ते होणार आहे.शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेश बोहरा यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यात उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड्.लक्ष्मणराव भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के, लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव लायन ॲड्.सुधीर दामले,ठाणेदार अजित जाधव,वाहतुकविभाग सहायक पोलिस निरीक्षक सीता वाघमारे, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण विदर्भातून या चार किलोमीटर दौड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन पद्धतीने ९०० धावपटूंनी नोंदणी केली आहे.
‘अ’ गटात १२ ते १६ वयोगटातील मुले व मुली असे दोन विभाग आहेत.प्रत्येक विभागात प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये रोख तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख ही पारितोषिके व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
‘ब’ गट १७ वर्षांवरील सर्वांसाठी खुला असून या गटात १७ वर्षांवरील मुले व मुली असे दोन विभाग आहेत.प्रत्येक विभागात प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये रोख तर तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख ही पारितोषिके व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
सर्व वयोगटातील पहिल्या तीन खेळाडूंना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
विदर्भस्तरीय आझादी की दौड स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे , उपप्राचार्य प्रा.सुनील पावडे, वणी लायन्स इंग्लिश मिडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत गोडे, वणी लायन्स वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य दीपा परिहार , स्पर्धेचे संयोजक प्रा.उमेश व्यास, शारिरीक शिक्षक प्रा.कमलेश बावणे,प्रा.शहजाद हुसैन यांचेसह दोन्ही आयोजन संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.