“शिक्षणरत्न ” डॉ नीलिमा दवणे यांची विद्यापीठाच्या अध्ययन व विस्तार मंडळावर निवड
निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
सुरेंद्र इखारे वणी :- प्रा. डाॅ. निलिमा दवणे, समाजशास्त्र, विभाग प्रमुख, , लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी तथा सदस्य, विभागीय महिला विंग! संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच अमरावती यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीच्या आजीव अध्ययन व विस्तार मंडळावर महाराष्ट्र विद्यापीठ कायदाच्या 45 नुसार सदस्य म्हणून मा. कुलगूरु प्रा. डाॅ. प्रमोदजी येवले यांनी पुढील पाच वर्षाकरिता नामित केली आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील समाजशास्त्र विभागप्रमुख तसेच .डॉ.निलीमा दवणे हया महाविद्यालयात गेली चार वर्षापासून रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत . शासनाचे विविध उपक्रम त्या मा.प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे यांच्या मार्गदर्शनात राबवितात .तसेच त्याचे संशोधन श्रेत्रात देखिल योगदान असून अनेक शोधनिंबध राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले असून त्या आचार्य पदवी मार्गदर्शिका आहे.त्याचे अभ्यासक्रमाचे चार पुस्तके प्रकाशित झाले आहे. शिक्षणश्रेत्रात योगदान दिल्याबद्दल ‘शिक्षणरत्न’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या अनुभवाचा नक्कीच लाभ विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार मंडळावर पदवी व
पदविका अभ्यासक्रम तसेच विभागामार्फत चालणाऱ्या विवीध उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असणार आहे .या निवडीबद्दल त्यांनी मा.कुलगूरू डॉ.प्रमोद येवले ,मा.प्र- कुलगूरू डॉ.प्रसाद वाडेगावकर,मा.कुलसचिव डॉ.तुषार देशमुख व आजीवन अध्ययन विस्तार मंडळाचे समन्वयक डॉ.श्रीकांत पाटील यांचे आभार मानले असून नियुक्तीबाबत शि.प्र.मं.चे उपाध्यक्ष मा. रमेशरावजी बोहारा, सचिव मा.-ॲड. लक्ष्मणरावजी भेदी, सहसचिव मा. श्री अशोक रावजी सोनटक्के, तसेच संचालक मंडळ तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे ,प्राध्यापक तथा कर्मचारी बंधूनी अभिनंदन केले आहे.