म.रा.लालबावटा शेतमजूर युनियनचे मारेगाव येथे जिल्हा अधिवेशन संपन्न सुरेंद्र इखारे वणी–– महाराष्ट्र राज्य लालबावटा खेतमजुर युनियनचे आज दि.23 आॅगस्ट 2023 रोजी मारेगाव येथील पक्ष कार्यालयात यवतमाळ जिल्हा अधिवेशन संपन्न झाले.प्रा.धनंजय आंबटकर यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख मार्गदर्शक म्हणुन युनियनचे राज्यसचिव शिवकुमार गणविर(गोंदिया) उपस्थित होते.अतिथी म्हणुन तुकाराम भस्मे,प्रागतिक आघाडीचे विधानसभा उमेदवार अनिल हेपट,अनिल घाटे,ऋषी उलमाले,,डॉ.तांबेकर उपस्थित होते.या अधिवेशनात शेतमजुरांच्या प्रश्नावर चर्चा होऊन त्यांचे मागण्यांना घेऊन प्रखर लढा उभारण्याचे ठरले,जिल्हा कौंसिलची निवड करण्यात आली,आगामी औरंगाबाद येथे होणारया राज्य अधिवेशनात सहभागी होण्यासाठी प्रतिनिधींची निवड करण्यात आली.अधिवेशनात जिल्ह्यातील आठ तालुक्यातुन शेतमजुर बहुसंख्येने सहभागी झाले.संचालन बंडु गोलर यांनी तर आभार वासुदेव गोहणे यांनी मानले.