22.6 C
New York
Wednesday, June 19, 2024

अकोला येथे जेष्ठ नागरिकांचे 6 वे प्रादेशिक अधिवेशन थाटात संपन्न  

अकोला येथे जेष्ठ नागरिकांचे 6 वे प्रादेशिक अधिवेशन थाटात संपन्न       

      विविध पुरस्कारांनी जेष्ठ नागरिकांचा गौरव

सुरेंद्र इखारे वणी :-  अकोला येथील राजराजेश्वर नगरी , जानोरकर मंगल कार्यालयात दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोज रविवारला सकाळी 11.00वाजता महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम्) मुबई यांचे वतीने पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभाग अकोला येथे जेष्ठ नागरिकांचे 6 वे प्रादेशिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

           या अधिवेशनाचे अध्यक्षस्थानी प्रकाश पिंपळकर हे होते, उदघाटक  श्री नानासाहेब इंगळे, प्रमुख पाहुणे अरुण रोडे, अण्णासाहेब टेकाळे, विवेक देशपांडे, विनायकराव पांडे, अंजुमन खान , चंद्रकांत महामुनी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच शंखनाद ,शांतीस्रोत करण्यात आला आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयघोष करण्यात आले.त्यानंतर साने गुरुजी यांच्या ” खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे” या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . याप्रसंगी मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मंचावरील मान्यवरांच्या शुभहस्ते सुवर्णसंध्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच कविता संग्रहाचे प्रकाशन ,याप्रसंगी नानासाहेब इंगळे यांचा सपत्नीक  जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .जेष्ठ नागरिक सदस्यांना सुद्धा कार्यगौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात 1कोटी 36 लाख जेष्ठ नागरिक आहे , जेष्ठ नागरिका पर्यंत पोहचण्यासाठी ” गाव तेथे संघ ” या उपक्रमाचे माध्यमातून पोहचायचे आहे.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश अंधारे यांनी केले  उद्घाटक नाना साहेब इंगळे साहेब ,प्रकाश पिंपळकर, अरुण रोडे, चंद्रकांत महामुनी, विवेक पांडे, अंजुमन खान, अण्णासाहेब टेकाळे, विनायक पांडे यांनी मनोगत व्यक्त केले या,कार्यक्रमाला यवतमाळ, अमरावती, वाशीम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच वणी ,मारेगाव व झरी तालुक्यातील जेष्ठ नागरिक एम एम घागी सर,नामदेव जेणेकर सर, उदय गोहोकार साहेब, अशोक ढवळे,  विठ्ठल झाडे बाबू, जयप्रकाश राजूरकर, बबन गोखरे साहेब, जितेंद्र भंडारी,देवराव ठक सर,पी एच नागतुरे सर,भास्कर धानफुलें सर,सुधाकर गारघाटे, शंकर शतपलकर, अर्जुन गोहोकार, मारोती ठवरी, बाळकृष्ण ढोके, मारोतराव वरारकर, पुरुषोत्तम निर, राजकुमार पाचभाई, उपस्थित होते या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जेष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News