25.7 C
New York
Wednesday, July 17, 2024

ट्रायबल टुरिझमला बळकटी देणे गरजेचे डॉ. शामराव कोरेटी यांचे प्रतिपादन

ट्रायबल टुरिझमला बळकटी देणे गरजेचे
डॉ. शामराव कोरेटी यांचे प्रतिपादन
रा.तु.म.नागपूर विद्यापीठाच्या प्रवास व पर्यटन विभागाचे आयोजन
नागपूर जयंत साठे : जगातील एकूण लोकसंख्येच्या पाच प्रतिशत लोक आदिवासी आहेत. ते भारतासह जपान, न्यूझीलंड, रशिया, इंग्लंड, कॅनडा, मसाई, सोमालया, चीन व तिबेट यासह विविध ९० देशात राहत असून त्यांचे ५२ प्रकारचे विविध समुदाय आहेत. त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ट्रायबल टुरिझमला बळकटी प्राप्त करून देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन मानवता विद्या शाखेचे विभाग प्रमुख डॉ. शामराव कोरेटी यांनी केले. ‘जमाती पर्यटन : संधी आणि आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रवास व पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या अतिथी व्याख्यानात बोलताना त्यांनी उपरोक्त उद्गार काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवास व पर्यटन विभागाचे प्रमुख डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे होते. याप्रसंगी बोलताना डॉ. शामराव कोरेटी म्हणाले की, भारतामध्ये 11 ते 12 कोटी लोक आदिवासी आहेत. ते भारतातील विविध प्रांतात राहतात. बस्तर, छत्तीसगढ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा आदी भागात ते मोठ्या प्रमाणात आहेत. जंगल, मैदान, वाळवंट या ठिकाणी ते आजही तग धरून आहेत. हा समाज पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवत नाही. तर पर्यावरणाचे संतुलन राखतो. त्यांची स्वतःची संस्कृती आहे. चंद्रपूर, शिरपूर, बल्लारपूर येथे गोंड राजांची राजधानी होती. 12 व्या शतकापर्यंत ते उच्च शिखरावर होते. त्यांचा वैभवशाली इतिहास होता. परंतु आक्रमकांसमोर ते फार काळ टिकू शकले नाही.परिणामी त्यांनी जंगलाचा आश्रय घेतला.त्यांना जंगले, झाडे- झुडपे यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक औषधीची प्रयोगशाळा जंगलामध्ये निर्माण करून त्याच औषधीच्या बळावर आपला उपचार करून घेतात.जंगलाचे संवर्धन कसे करावे हे त्यांच्याकडून शिकता येते. भौगोलिक नैसर्गिक वातावरण यामध्ये ते मिसळून गेले आहेत. आदिवासी लोकांना लाकडी काम, धातू काम, औषधी याची चांगली जाणीव आहे. जंगलातील झाडांच्या मुळापासून वाहणारे पाणी हे औषधीयुक्त आहे हे आता संपूर्ण जगाला दिसून आलेले आहेत.ते पाणी पितात.कमीत कमी संसाधनाच्या माध्यमातून जगण्याची कला आदिवासी समाजाने आत्मसात केली आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन रामदास बागडे, पाहुण्यांचा परिचय नरेश मेश्राम तर आभार दीपक उके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अरविंद उपासनी, भाग्यश्री हिरादेवे, नेहा दुबे, प्रा, शोभना मेश्राम,प्रा. परिमल सुराडकर, प्रा.मंजुषा डोंगरे, प्रा. अमरदीप बारसागडे, जयंत साठे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Surendra Ikhare

सुरेंद्र इखारे

सुरेंद्र इखारे

संपादक
जयंत साठे

जयंत साठे

उपसंपादक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

Recent News