लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे वृक्षारोपण
सुरेंद्र इखारे वणी :- लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या तर्फे स्वयंसेवकांनी ” मेरी माटी मेरा देश” या अभियाना अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी “मेरी माटी मेरा देश ” हे आवाहन संपूर्ण देशाला केलेले आहे. या अनुषंगाने दिनांक 12 सप्टेंबर 2023 ला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अमृत कलशाचे पूजन करून अमृत कलेशांमध्ये सर्व स्वयंसेवकांनी आपापल्या परिसरातून आणलेली माती अर्पित केली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानजोडे , प्रा. डॉ. अभिजीत अणे , पत्रकार सागर मुने आणि महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांसह राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. नीलिमा दवणे आणि डॉ. विकास जुनगरी यांनी सुद्धा कलशा मध्ये माती अर्पण करून मातीला नमन केले आणि या देशाच्या वीरांना वंदन करण्यात आले . यानंतर “एक कुटुंब एक वृक्ष” या अभियानांतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांना मा. प्राचार्यांच्या हस्ते आणि डॉ. अभिजित अणे यांच्या हस्ते वृक्षांचे वाटप करण्यात आले .
वनी शहरांमध्ये वाढत्या प्रदूषणा चा विचार करता शहराचे पर्यावरण सुरक्षित रहावे या उद्देशातून कृषी उत्पन्न बाजार समिती वणी च्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले . याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. विनायराव एकरे ,सचिव मा. गारघाटे, मा. झाडे, संचालक मंडळ , तसेच कर्मचारी उपस्थित होते. लोकमान्य टिळक महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्या उपस्थितत आणि मार्गदर्शनात हा उपक्रम पुर्ण झाला. यावेळी ,रासेयो कार्यक्रम अधिकारी निलिमा दवणे आणि डॉ. विकास जुनगरी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व याठिकाणी बहुसंख्य विद्यार्थ्यांचे योगदान लाभले . या कार्यक्रमाच्या यशसवीतेसाठी मा. गज्जलवार साहेब बी.डि.ओ. पंचायत समिती वनी, वनाधिकारी यांचे सहकार्य लाभले.