राजकीय व्यवस्था लोकशाहीला मारक
एक राष्ट्र एक निवडणूक भ्रामक संकल्पना
संविधानाचे अभ्यासक प्रा.देविदास घोडेस्वार यांचे प्रतिपादन
नागपूर जयंत साठे: सध्याची राजकीय व्यवस्था लोकशाहीला मारक होत असून लोकशाहीला हूकुमशाहीकडे वळविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातूनच एक राष्ट्र एक निवडणूक ही भ्रामक संकल्पना जन्मास आल्याचे प्रतिपादन संविधानाचे अभ्यासक प्रा.देविदास घोडेस्वार यांनी केले. ते बहुजन हिताय संघाने आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी उत्तम ऊके होते. प्रा.देविदास घोडेस्वार पुढे म्हणाले की, विद्यमान सरकार हे संविधानावर आघात करून संविधान धोक्यात आणत आहे. कार्यक्रमाचे संचालन अॅड. हंसराज भांगे तर आभार ज्ञानेश्वर वाकोडे यांनी मानले.
समापन गाथा बौध्दाचार्य देविदास राऊत यांनी म्हटली.
राष्ट्रगीत अरुणा ताई पाटील, संगीता ताई पानतावणे आणि वर्षाताई टेंभेकर यांनी सादर केले.